Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजला विविध सामाजिक उपक्रमांनी आमदार शिवाजीराव पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा



गडहिंग्लज (प्रतिनिधी ): चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार  शिवाजीराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, गडहिंग्लज तालुक्याच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.



कार्यक्रमाची सुरुवात गडहिंग्लजचे ग्रामदैवत श्री काळभैरव मंदिर येथे आमदार शिवाजी पाटील यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व जनसेवेच्या अखंड कार्यासाठी विशेष आरती व प्रार्थनेने करण्यात आली. यानंतर शिवाजी चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास सोमगोंडा आरबोळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.



भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास तालुकाध्यक्ष प्रितम कापसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला, तर महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अविनाश दुध्यागोळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच दसरा चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासही अभिवादन करण्यात आले.



त्यानंतर उपजिल्हा रुग्णालय, गडहिंग्लज येथे दाखल रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत खोत यांचा सन्मान करण्यात आला. तसेच शहरातील विविध शासकीय आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा आमदार शिवाजीराव पाटील वाढदिवस समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.



वाढदिवस हा केवळ शुभेच्छांचा उत्सव न राहता समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि सेवाभाव जपण्याचा संकल्प असावा, या उद्देशाने हे उपक्रम राबविण्यात आले. मंदिरातील प्रार्थना, महापुरुषांना अभिवादन, रुग्णांना फळवाटप आणि आरोग्यसेवकांचा गौरव अशा माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस अर्थपूर्ण पद्धतीने साजरा करण्यात आला. समाजहिताची प्रेरणा देणारे असे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.



या कार्यक्रमास तालुकाध्यक्ष प्रितम कापसे, अरुण मोकाशी, सोमगोंडा आरबोळे, प्रा. स्वातीताई कोरी, जयकुमार मन्नोळी, शहराध्यक्ष संदीप कुरळे, सचिन घुगरे, विनोद बिलावर, सुभाष चोथे, शिवा धनवडे, दत्तात्रय ऐवाळे, संजय कुलकर्णी, माधव पाटील, आर. बी. भोसले, अमर व्हसकोटी, संजय बटकडली, अमित पाटील, विशाल नेवडे, राजू खमलेट्टी, आशिष किंकर, अवधूत सुतार, सागर पाटील यांच्यासह भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी, बूथ अध्यक्ष, शक्तिकेंद्र प्रमुख व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आमदार शिवाजीराव पाटील जनसंपर्क कार्यालयाचे प्रमुख राजू डावरी यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.