Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजच्या साधना हायस्कूलला विजेतेपद

‘एमआर’- युनायटेड ट्रॉफी फुटबॉल: चिकालगुडचा शंकरलिंग स्कुल उपविजेता; शिवाजी विद्यालय तृतीय


गडहिंग्लज :  विजेत्या साधना हायस्कुलला करडंक देताना तुषार पाटील. सोबत बाळ पोटे-पाटील, प्रविण चव्हाण, पी. पी. खवरे आदी. 



गडहिंग्लज (प्रतिनिधी ):  अंतिम  फुटबॉल सामन्यात स्थानिक साधना हायस्कूलने चिकालगुडच्या (ता. हुक्केरी) शंकरलिंग स्कूलला २-० असे हरवून विजेतेपदासह एमआऱ युनायटेड ट्रॉफी पटकावली. छत्रपती शिवाजी विदयालयाने अभिनव स्कूलचा ३-० असा पराजय करून तिसरा क्रमांक मिळविला. साधनाचा अरूष दावणेने स्पर्धा वीरचा बहुमान पटकावला. येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन मार्फत बारा वर्षाखालील गटासाठी गेले तीन दिवस हि स्पर्धा सुरु होती. तेरा संघाचा सहभाग असणा-या स्पर्धेचे यंदाचे चौथे वर्ष होते.


अंतिम सामन्यात साधनाने चेंडूवर वर्चस्व राखत आक्रमणांचा धडाका लावला. आठव्या मिनिटाला गोल क्षेत्रात उडालेल्या गोंधळाचा फायदा घेत साधनाच्या नुमान मुल्लाने गोल करून खाते उघडले. उत्तरार्धात साधनाच्या आरुष दावणेने संघाचा दुसरा गोल करून आघाडी २-० अशी भक्कम केली. शंकरलिग स्कुलच्या तुफेल हजरतभाई, मनोज कुमार यांनी गोल फेडण्यासाठी   शर्थीचे प्रयत्न केले. पण, साधनाचा गोलरक्षक कार्तिक चव्हाण याने चिवट गोलरक्षण करून त्यांचे प्रयत्न हाणून पाडले. अखेर २-० याच गोलफरकावर साधना हायस्कुलने विजेतेपद निश्चित केले. दरम्यान, शिवाजी विदयालयाने अभिनव स्कूलला ३-० असे सहज हरवून तिसरा क्रमांक मिळविला. शिवाजीच्या श्रेयस पाटीलने गोलची हॅटट्रिक केली.



साई इंटरनँशनल स्कुलचे विश्वस्त तुषार पाटील, एम. आर. हायस्कुल माजी विदयार्थी संघटनेचे बाळ पोटे पाटील, प्रविण चव्हाण, मुख्याध्यापक पी. पी. खवरे यांच्याहस्ते विजेत्या आणि उपविजेत्यांना चषक, क्रीडासाहित्य देऊन गौरविण्यात आले. यावेळी युनायटेडच संचालक प्रशांत दड्डीकर, ओम़कार जाधव, तानाजी देवेकर, सौरभ जाधव, किरण म्हेत्री, विनायक नाईक यांच्यासह क्रीडाशिक्षक, पालक उपस्थित होते. समन्वयक सश्रृत सासनेसह पाच सर्वोत्कृष्ठ खेळाडूंचा सत्कार झाला. ललित शिंदे यांनी प्रास्ताविक केले. सागर पोवार यांनी आभार मानले.


स्पर्धा वीर – आरूष दावणे ( साधना )

गोलरक्षक – मनोज कुमार ( शंकरलिंग )

बचावपटू – ऋग्वेद पाटील ( शिवाजी )

मध्यरक्षक – तुफेल हजरतभाई ( शंकरलिंग )

आघाडीपटू – कणक सुतार ( साधना )



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.