Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आमदार शिवाजीराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महागाव ग्रामपंचायतीचा अनोखा सामाजिक उपक्रम

रामतीर्थ परिसर बहरणार ; 'एक झाड आमदारांच्या नावाने' उपक्रमांतर्गत महागाव ग्रामपंचायतीतर्फे विविध देशी व फळझाडांचे वृक्षारोपण


महागाव : रामतीर्थ परिसर येथे वृक्षारोपण करताना सरपंच प्रशांत शिंदे, उपसरपंच संदीप कोकितकर, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ.


गडहिंग्लज (प्रतिनिधी ): पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी जपत महागाव ग्रामपंचायतीच्या वतीने चंदगड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शिवाजीराव पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. 'एक झाड आमदारांच्या नावाने' या संकल्पनेअंतर्गत प्रसिद्ध पर्यटन व धार्मिक स्थळ असलेल्या रामतीर्थ परिसर येथे उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले. लोकप्रतिनिधीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राबवलेल्या या विधायक उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.



पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तसेच स्थानिक जैवविविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी या मोहिमेत मुख्यत्वे देशी आणि फळझाडांच्या रोपांची निवड करण्यात आली होती. यामध्ये वड, पिंपळ, करंज, काजू आणि फणस यांसारख्या बहुगुणी झाडांचा समावेश आहे. वृक्षारोपणासोबतच या रोपांचे संगोपन करण्याचा निर्धारही ग्रामपंचायतीच्या वतीने व्यक्त करण्यात आला.


नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव

सामान्यतः वाढदिवसानिमित्त होणारे अनावश्यक खर्च टाळून महागाव ग्रामपंचायतीने वृक्षारोपणासारखा पर्यावरणाला पूरक ठरणारा उपक्रम हाती घेतला. यातून समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण झाला असून या उपक्रमाचे सर्वत्र विशेष कौतुक होत आहे.


या वृक्षारोपण प्रसंगी महागावचे सरपंच प्रशांत शिंदे, उपसरपंच संदीप कोकितकर, ग्रामपंचायत सदस्य सुरज असवले, परशराम हुले, फिरोज सोलापूर, अर्जुन रेडेकर, राजू वाली, पांडुरंग चौगुले, अर्जुन दिवटे, संजय दासनहट्टी यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.