Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महसूल कर्मचाऱ्यांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे - जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड

महसूल दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न 




कोल्हापूर :  महसूल विभागात काम करताना अधिकारी कर्मचाऱ्यांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते व त्याचे विपरीत परिणाम कालांतराने दिसून येतात.त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे तसेच सर्वांनी हेल्थ इन्शुरन्स,टर्म इन्शुरन्स अशा पॉलिसी काढून ठेवाव्यात. जेणेकरून दुर्दैवाने आकस्मितपणे कोणतीही दुर्दैवी घटना घडल्यास कुटुंबावर आर्थिक बोजा पडणार नाही.असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांनी आज केले

            


1 ऑगस्ट,महसूल दिनाचे औचित्य साधून  महाराणी ताराबाई सभागृह येथे महसूल दिनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद डॉ जॅसमिन,अपर जिल्हाधिकारी  अजय पवार निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव,जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख शिवाजी भोसले, उपजिल्हाधिकारी डॉ संपत खिलारी, उपजिल्हाधिकारी(निवडणूक ) मोहिनी चव्हाण, उपाजिल्हाधिकारी शक्ती कदम , उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे,उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले प्रामुख्याने उपस्थित होते.

   

जिल्हाधिकारी म्हणाले,सर्व अधिकारी,कर्मचारी यांनी आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सहकार्य करून त्यांच्या अडचणी ऐकून घेऊन त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न करावा तसेच त्यांनी महसूल विभागाची कार्यपद्धती , महत्व , विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबाबत महसूल विभागाचा हातखंडा याबाबत सविस्तर विवेचन केले.

               

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते एकूण 26 अधिकारी व कर्मचारी यांना उत्कृष्ट अधिकारी आणि कर्मचारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.महसूल दिनाचे औचित्य साधून अजय पवार शिवाजी भोसले,प्रसाद चौगुले,तहसीलदार सुशील बेल्हेकर, अंकुश रानमाळे,भाऊसाहेब खोत यांनी मनोगत व्यक्त केले.


                      

नुकतेच अपघातात मयत झालेले महसूल कर्मचारी मारुती विठ्ठल मकर यांच्या पत्नी श्रीमती काजल मारुती मकर यांना शिपाई पदावर अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यात आली. अपघातानंतर केवळ एका महिन्यातच ही नियुक्ती दिली गेली . यासाठी जिल्हा प्रशासन आणि महसूल कर्मचारी संघटनेचे विशेष प्रयत्न कामी आले तसेच यावेळी सुमारे 2 लाख रुपयांची आर्थिक मदत जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मकर कुंटुबियांना देण्यात आली.या अनपेक्षितपणे मिळालेल्या मदतीबद्दल त्यांनी प्रशासन व संघटनेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.