Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

ग्राहकांच्या विश्वासाला सेवेची जोड! हलकर्णीत एक्साईड मोफत बॅटरी चेकअप कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद



हलकर्णी (वार्ताहर) : वाहनधारकांना दर्जेदार उत्पादनासोबतच उत्तम विक्रीनंतरची सेवा (आफ्टर सेल्स सर्व्हिस) आणि मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने हलकर्णी येथील ‘अमन इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल्स’ व प्रसिद्ध ‘एक्साईड’ (Exide) कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत बॅटरी चेकअप कॅम्पला परिसरातील वाहनधारकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कॅम्पच्या माध्यमातून शेकडो ग्राहकांनी आपल्या वाहनांतील बॅटरीची मोफत तपासणी करून घेत सुरक्षित प्रवासाचा मार्ग सुकर केला.



या विशेष शिबिराचा शुभारंभ हलकर्णी येथील युवा उद्योजक अल्ताफ मुल्ला आणि एक्साईड कंपनीचे विभागीय अधिकारी आशुतोष कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व हस्ते अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.



तज्ज्ञांकडून मोफत तपासणी व मार्गदर्शन 


आजच्या आधुिनक आणि धावपळीच्या युगात वाहनधारकांना आपल्या वाहनाच्या बॅटरीची वेळोवेळी तपासणी करून घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. हीच अडचण ओळखून अमन इलेक्ट्रॉनिक्स आणि एक्साईड कंपनीने या सामाजिक बांधिलकी जपणार्‍या उपक्रमाचे आयोजन केले होते. या शिबिरात एक्साईड कंपनीच्या टेक्निकल टीमने ग्राहकांच्या वाहनातील बॅटरीची सखोल तपासणी करून तिची सध्याची स्थिती, कार्यक्षमता आणि आवश्यक देखभालीबाबत मोफत व मोलाचे मार्गदर्शन केले. विशेषतः गॅरंटी कालावधीत असलेल्या बॅटरींची मोफत तपासणी करून दिल्यामुळे उपस्थित वाहनधारकांनी तीव्र समाधान व्यक्त केले.



वेळ अन् पैशांची बचत; ग्राहकांकडून कौतुक


बॅटरीची योग्य देखभाल कशी करावी, वेळेवर तपासणी न केल्यास भविष्यात उद्भवणार्‍या संभाव्य अडचणी कशा टाळाव्यात, याविषयी अत्यंत सोप्या भाषेत माहिती देण्यात आली. त्यामुळे भविष्यात होणारा मोठा खर्च आणि वेळेचा अपव्यय टळण्यास मदत झाल्याची भावना ग्राहकांनी बोलून दाखवली. केवळ बॅटरीची विक्री न करता ग्राहकांना विक्रीनंतरही तत्पर आणि मोफत सेवा पुरविल्याबद्दल अमन इलेक्ट्रॉनिक्स व एक्साईड कंपनीचे परिसरातून विशेष कौतुक होत आहे.



या प्रसंगी एक्साईडचे विभागीय सेल्स मॅनेजर आशुतोष कांबळे, प्रकाश तेलवेकर, विशाल अत्तीग्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर पाटील, सलीम ताशिलदार, चंद्रकांत भोसले, आदित्यसिंग राठोड, युवराज मठपती, महादेव मुंगुरवाडी, कैपाना चौगुले, मुश्किल पानारी, बाबासाहेब कादरभाई, राजू सकुंडे, राजू वड्राळे, इरफान मुल्ला, शिवाजी लोखंडे, उमरअली बागवान, बाळासाहेब सुतार, आप्पासाहेब नडगेरी, राजू खलिफा, बागवान यांच्यासह ‘अमन इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल्स’चे सर्व पदाधिकारी, कर्मचारी आणि परिसरातील वाहनधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.