२०२६ च्या गणेशोत्सवासाठी नूतन कार्यकारिणी बिनविरोध
गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील बालाजी युवक मंडळाच्या सन २०२६ च्या गणेशोत्सवासाठी नूतन कार्यकारिणीची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या मंडळाच्या विशेष बैठकीत अध्यक्षपदी राज बिलावर यांची सर्वानुमते निवड झाली.
मंडळाच्या उपाध्यक्षपदाची धुरा सुजल बिलावर यांच्याकडे सोपवण्यात आली असून, खजिनदारपदी महेश बादामी तर सचिवपदी अमोल बिलावर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
या बैठकीला मंडळाचे आजी-माजी पदाधिकारी, ज्येष्ठ कार्यकर्ते आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. आगामी गणेशोत्सव अधिक शिस्तबद्ध आणि भव्य स्वरूपात साजरा करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
या निवडीप्रसंगी विनोद बिलावर, आप्पासाहेब बिलावर, अरुण बिलावर, किसन बिलावर, विरसिंग बिलावर, व्यंकटेश बिलावर, सचिन बिलावर, बाबासाहेब बिलावर, राजू बिलावर, अभिजीत बिलावर आणि नोमेश्वर बिलावर यांचे विशेष सल्लागार व मार्गदर्शक म्हणून मोलाचे सहकार्य लाभले.
बैठकीच्या शेवटी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करण्यात आले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन अभिनंदन ठराव मंजूर करण्यात आला.

