Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

विद्या मंदिर ऐनापूर येथे नूतन शाळा व्यवस्थापन समितीची बिनविरोध निवड

सेवापूर्तीबद्दल शिक्षिकेचा सत्कार अन् नूतन शिक्षिकेचे स्वागत




गडहिंग्लज (प्रतिनिधी) : विद्या मंदिर ऐनापूर येथे २०२६–२८ या कालावधीसाठी नूतन शाळा व्यवस्थापन समितीची निवड आणि सत्कार समारंभ अत्यंत उत्साहात व पारदर्शक वातावरणात पार पडला. यासोबतच शाळेतील शिक्षकांचा कृतज्ञता सत्कार आणि नूतन शिक्षिकेचा स्वागत सोहळाही मोठ्या उत्साहात संपन्न झाला.


कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सौ. शुभांगी अशोक मांगले आणि उपाध्यक्षपदी सुनिल शंकर जाधव यांची आरक्षणानुसार एकमताने निवड करण्यात आली. निवडीनंतर मावळते अध्यक्ष यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


नूतन शाळा व्यवस्थापन समिती (२०२६–२८) कार्यकारिणी पुढीलप्रमाणे -


अध्यक्ष सौ. शुभांगी अशोक मांगले, उपाध्यक्ष सुनिल शंकर जाधव, सचिव विजय कृष्णा पोवार, सदस्य/सदस्या  सौ. रमा सोमनाथ कुंभार, मेहबूब सिलेमान मकानदार, सौ. निवेदिता सतीश देसाई, सौ. शीतल विक्रम देसाई, लहूकुमार उत्तम दड्डीकर, विष्णू जयसिंग परीट, विशाल धोंडिबा सुतार, सौ. अमृता निवृत्ती मांगले, सौ. सुषमा अमोल मासुले. शिक्षणतज्ञ दादासो भीमराव देसाई, स्थानिक प्राधिकरण धोंडिबा दशरथ कांबळे, शिक्षक प्रतिनिधी भरत मारुती शेळके.


शिक्षिका सत्कार व स्वागत सोहळा 


शाळेमध्ये मागील ३ वर्षे निष्ठापूर्वक ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या ऐनापूरच्या कन्या, शिक्षिका सादिका महम्मद मकानदार यांचा त्यांच्या अमूल्य शैक्षणिक सेवेबद्दल शाळेच्या वतीने विशेष सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. तसेच शाळेत नूतन शिक्षिका म्हणून रुजू झालेल्या गावच्याच सौ. अर्चना शुभम पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी विजय शिंदे यांचेही अभिनंदन करण्यात आले.



नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली व सर्वांच्या सहकार्याने शाळेची आणि विद्यार्थ्यांची उत्तरोत्तर प्रगती होत राहो, अशी सदिच्छा याप्रसंगी व्यक्त करण्यात आली.


या सोहळ्यास शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार शाळेच्या प्र. मुख्याध्यापिका  सौ. सुवर्णा रेडेकर यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.