पोलीस घटनास्थळी दाखल, हल्लेखोराचा शोध सुरू
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज- संकेश्वर रोडवरील अर्बन बँकेसमोर एका इसमावर भर दिवसा चाकू हल्ला झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. घटनेनंतर गडहिंग्लज पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून संबंधित हल्लेखोर संशयिताचा शोध घेतला जात आहे. जखमी इसमावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यात जखमी झालेला कर्मचारी हा एका बँकेचा कर्मचारी असल्याचे सांगितले जात आहे.
हा हल्ला नेमका कोणत्या कारणावरून झाला याचा उलगडा पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. पोलिसांनी हल्लेखोराने हल्ल्यासाठी वापरलेला चाकू जप्त केला असून वेगवान तपास सुरू आहे.

