Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

३५ वर्षांच्या निष्कलंक सेवेचा ‘खाकी’ सन्मान; होमगार्ड आण्णासो खानापुरे सेवानिवृत्त

गडहिंग्लजचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांच्या हस्ते गौरव




गडहिंग्लज (संपत सावंत ): संघर्षमय परिस्थितीतही कर्तव्याशी कधीच तडजोड न करता, तब्बल ३५ वर्षे निष्ठेने आणि प्रामाणिकपणे सेवा बजावणारे गडहिंग्लज पोलीस ठाण्याचे सहाय्यक लीडर होमगार्ड आण्णासो दुंडाप्पा खानापुरे यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव करण्यात आला. पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन त्यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. डॉ. रमेश पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.


खानापुरे यांनी नशिबापेक्षा कर्तृत्वावर आणि भाग्यापेक्षा परिश्रमावर विश्वास ठेवून अविरत निष्कलंक सेवा बजावली, अशा शब्दांत सतीश होडगर यांनी त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव केला. त्यांचा वक्तशीरपणा, हजरजबाबीपणा आणि धाडसी स्वभाव पोलीस दलातील सर्वांसाठीच आदर्शवत आहे, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. तर, ३५ वर्षांची ही अखंड सेवा म्हणजे केवळ कर्तव्यपूर्ती नसून नव्या पिढीसाठी प्रामाणिकपणा आणि समर्पणाचा एक प्रेरणादायी वस्तुपाठ आहे, असे प्रतिपादन डॉ. रमेश पाटील यांनी अध्यक्षीय मनोगतातून केले.


सुरुवातीला आण्णासो भोसले यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. संपत सावंत यांनी मानपत्राचे वाचन करून खानापुरे यांच्या ३५ वर्षांच्या सेवाप्रवासाला उजाळा दिला.


या प्रसंगी सौ. पल्लवी पवार, सागर पाटील, ट्रॅफिक इंचार्ज सुहास शिंदे, राजेश पाटील, अभिजीत पाटील, दत्ता शिंदे, सौ. रेश्मा नाईक, रमेश मोरे, रामदास किल्लेदार, दादू खोत, सौ. डी. बी. करडे, सुनील पाटील, मल्लाप्पा कोचरी, काशिनाथ चौगुले, सौ. प्रियंका इंगवले, काशिनाथ स्वामी, मलगोंडा पाटील, अमृत सावंत, सुरेश चौगुले, अशोक वाडकर, अशोक कलाज, अर्जुन मोरे, आप्पासो चौगुले, सुरेश गुडदे व राजू वाडकर यांसह अनेक मान्यवर व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.


कार्यक्रम प्रसंगी उपस्थितांनी खानापुरे यांच्या पुढील सुखी व आरोग्यदायी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुरारी लोहार यांनी केले. उपस्थितांचे आभार राजू भोजणे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.