संकष्टीच्या दिवशी तब्बल १०० जणांनी केले रक्तदान, मोफत आरोग्य शिबिरालाही उत्स्फूर्त प्रतिसाद
आमदार शिवाजीराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
३०० नागरिकांनी घेतला मोफत आरोग्य शिबिराचा लाभ
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भडगाव येथे भारतीय जनता पार्टी आणि भडगाव ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने मोफत रक्तदान व भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. संकष्टी चतुर्थीचा उपवास आणि धो-धो पडणारा पाऊस असतानाही ग्रामस्थांनी या उपक्रमास अभूतपूर्व प्रतिसाद देत तब्बल १०० जणांनी रक्तदान केले , तर ३०० हून अधिक नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.
या संयुक्त उपक्रमाचे उद्घाटन चंदगड शहर संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्षा भारतीताई जाधव आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रवीश पाटील (कौलवकर) यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले.
'जनसेवा हीच ईश्वरसेवा' या विचाराने उपक्रम : नितेश कोरी
आमचे आमदार शिवाजीराव पाटील हे 'जनसेवा हीच ईश्वरसेवा' हा मंत्र आम्हाला नेहमी सांगतात. त्याच प्रेरणेतून आमदार साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जनसेवेचा हा छोटासा प्रयत्न भडगाववासीयांच्या माध्यमातून केला आहे, असे भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस नितेश कोरी यांनी सांगितले.
या आरोग्य शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडून विविध आजारांची मोफत तपासणी करण्यात आली. यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. यावेळी १०० जणांनी रक्तदान केले. आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ ३०० हून अधिक नागरिकांनी घेतला. यामध्ये १०० हून अधिक महिलांचा समावेश होता. ५० हुन अधिक रुग्णांची ईसीजी (ECG) तपासणी, पंचवीसहुन अधिक नेत्र तपासणी तर १०० हुन अधिक रुग्णांचे जनरल हेल्थ चेकअप करण्यात आले.
या प्रसंगी भाजपा गडहिंग्लज मंडळ अध्यक्ष प्रीतम कापसे, भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संतोष कुंभार, रवींद्र शेंडुरे, राजू खमलेट्टी, दयानंद पटणकुडी, दत्तात्रेय ऐवाळे, मल्लिकार्जुन आरबोळे, सचिन पाटील, आनंदा चोथे, सचिन जाधव, संकेत चोथे, चंद्रकांत धनवडे, शिवा पाटणकोडी, विनायक शिंत्रे, सौरभ कोरी, आकाश कित्तूरकर, सुहास पाटील, विनायक दरेकर, राजेश गुरव, अमर चिनगुडे, अजित कोरी, मोहित चौगुले, देवराज धनवडे, महेश राजगोळे आणि सागर गोरुले यांच्यासह भडगाव ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, भडगाव ग्रामस्थ, भारतीय जनता पार्टीचे विविध पदाधिकारी, बूथ अध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

