Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिक्षणमहर्षी डॉ. डी. वाय. पाटील यांचे कोल्हापुरात निधन



कोल्हापूर :  माजी राज्यपाल आणि पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. डी. वाय. पाटील (वय वर्षे ९०)यांचे कोल्हापूर येथे आज निधन झाले.


शिक्षणमहर्षी म्हणून ओळखले जाणारे डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात मोठे साम्राज्य उभारले होते.  काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली होती. मात्र, काही काळानंतर त्यांनी सक्रिय राजकारणापासून बाजूला होत शिक्षण क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले होते.


डॉ. पाटील यांच्या परिवारातील  सदस्य विविध शैक्षणिक संस्थांच्या व्यवस्थापनाशी संबंधित आहेत. त्यांचे पुत्र डॉ. संजय डी. वाय. पाटील, सतेज उर्फ बंटी डी वाय पाटील, विजय डी. पाटील, डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील यांच्यासह कन्या डॉ. नंदिता पालशेतकर आणि इतर सदस्य शिक्षण व आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या निधनाने राज्यावर शोककळा पसरली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.