गडहिंग्लज (प्रतिनिधी ): येथील महात्मा फुले विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्यपदी डॉ.प्रा. पी.डी. पाटील निवड करण्यात आली.समर्थ महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आय.एस.पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
प्रा. पी.डी.पाटील यांनी ३२ वर्षे राज्यशास्त्र विषयाचे अध्यापन केले.एचएससी बोर्ड परीक्षेसाठी राज्यशास्त्र विषयाचे १४ वर्षे परीक्षक,१० नियामक व २ वर्षे मुख्य नियमक म्हणून काम केली. त्यांनी महाराष्ट्रसह कर्नाटक,गोवा या राज्यात विविध विषयावर व्याख्याने दिली.अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे गडहिंग्लज तालुका कार्याध्यक्ष,कॉम्रेड गोविंद पानसरे विचार मंचचे अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य दारूबंदी कृती समितीचे जिल्हा समन्वयक या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले. त्यांना आशिया इंटरनॅशनल कल्चर अँड सोसायटी युनिव्हर्सिटी डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आले.
निवडीबद्दल समर्थ महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक चेअरमन शंकरराव पाटील,संस्था प्रतिनिधी प्रा. डी. एस. पाटील, अण्णासाहेब पाटील, गोड साखरचे संचालक विद्याधर गुरबे,गोड साखरेचे सचिव शामराव हरळीकर,उद्योजक रमेश रेडेकर, गोड साखरचे माजी संचालक सागरभाऊ देसाई जितेंद्र शहा, प्रकाश जाधव,प्रशांत शिंदे,पर्यवेक्षक मोहन कांबळे, माजी मुख्याध्यापक एन.आर.फडके, दत्ता देशपांडे, एस.एल.पाटील, प्रकाश इंगळे, सुरेश साटपे,भीमराव भुईंबर,रावसाहेब मुरगी,यांच्यासह संस्थेचे माजी कर्मचारी, सर्व प्राध्यापक व शिक्षकांनी अभिनंदन केले.


