Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

निलजी बंधाऱ्यात अनोळखी पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला



गडहिंग्लज (प्रतिनिधी):  निलजी (ता. गडहिंग्लज) येथील बंधाऱ्याच्या पात्रात एका ४० ते ४५ वयोगटातील अनोळखी पुरुषाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला आहे. सोमवार, २४ ऑगस्ट रोजी सकाळी पावणेआठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली असून, गडहिंग्लज पोलीस ठाण्यात मयत याबाबत नोंद करण्यात आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, निलजी येथील पोलीस पाटील व शेतकरी सतीश बसाप्पा काळापगोळ (वय ४०) हे सकाळी ७ वाजता निलजी बंधाऱ्यावरून नूल गावाच्या दिशेने फिरायला गेले होते. सकाळी ७.४५ च्या सुमारास परत येत असताना बंधाऱ्याजवळ त्यांना तीव्र दुर्गंधी आली. त्यांनी बंधाऱ्याच्या पाण्यात पाहिले असता कचऱ्यामध्ये एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह उताण्या स्थितीत तरंगताना दिसला. या प्रकरणी काळापगोळ यांनी तातडीने गडहिंग्लज पोलिसांत वर्दी दिली.


मयताचे वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे असून शरीरयष्टी मजबूत बांधा,. अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट, पांढऱ्या रंगाची बनियान आणि काळपट रंगाची पॅन्ट, डाव्या हातात चांदीचे ब्रेसलेट आहे. सदर वर्णनाचा कोणताही पुरुष बेपत्ता असल्यास किंवा या मृतदेहाबाबत काहीही माहिती मिळाल्यास तातडीने गडहिंग्लज पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे करत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.