Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'जागृती' प्रशालेत विद्यार्थ्यांना करिअर समुपदेशन



गडहिंग्लज (संपत सावंत): विद्या प्रसारक मंडळ, गडहिंग्लज संचलित जागृती प्रशालेत विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधींची माहिती मिळावी आणि भविष्यातील करिअरची योग्य दिशा निवडता यावी, या उदात्त हेतूने करिअर समुपदेशन  अतिशय उत्साहात संपन्न झाले.


स्वागत व प्रास्ताविक सदानंद फुटाणे यांनी केले. इराप्पा मरडी यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सीए मा. सौरभ पाटणकर,  सीए  राघवेंद्र बाकरे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. अनिल मसाळे होते.


सौरभ पाटणकर यांनी विद्यार्थ्यांना सीए होण्याचे महत्त्व, या क्षेत्रातील विविध संधी तसेच आवश्यक शैक्षणिक तयारी याबाबत बहुमोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडी, क्षमता आणि कल यांचा विचार करून करिअरची योग्य दिशा निवडावी, असा मौलिक सल्लाही त्यांनी दिला. अनिल मसाळे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.




यावेळी मुख्याध्यापक उमेश सावंत, पर्यवेक्षक महंतेश दड्डी, रवींद भंडारे,प्रकाश गायकवाड यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल कांबळे यांनी तर प्रवीण पाटील यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.