गडहिंग्लज (संपत सावंत) : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पुणे शहर शाखेच्या वतीने शहीद डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त "विद्ये विना मती गेली" या विषयावर नुकत्याच झालेल्या पंधरा वर्षाखालील राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत विद्या प्रसारक मंडळ, गडहिंग्लज संचलित जागृती हायस्कूलची कु. अन्वी घुरे हिच्या चित्राला उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त झाला. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे संचालक इंजि. किशोर हंजी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी सहसचिव गजेंद्र बंदी, मुख्याध्यापक उमेश सावंत, उपमुख्याध्यापक अनिल मसाळे, पर्यवेक्षक महंतेश दड्डी उपस्थित होते. कलाशिक्षक दत्ता लोहार यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. तिच्या यशाबद्दल सर्वतक कौतुक होत आहे.

