Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी घेतले श्री अंबाबाई देवीचे दर्शन



कोल्हापूर :  महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी आज कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीचे दर्शन घेतले.


दर्शनानंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ॲड. नार्वेकर म्हणाले की, राज्यातील सर्व नागरिकांना सुख, समृद्धी प्राप्त होवो व चांगला पाऊस पडून पर्यावरणाचे संवर्धन होवो, यासाठी श्री महालक्ष्मी अंबाबाईच्या चरणी प्रार्थना केली.



याप्रसंगी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती सचिव वर्षा साळुंखे- परीट, महादेव दिंडे, गणेश निर्लेकर, समित कदम, विजय जाधव आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.