Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज युनायटेडतर्फे बारा वर्षाखालील फुटबॉलपटूंना किटवाटप

गडहिंग्लज : गडहिंग्लज युनायटेड फुटबाँल असोसिएशनतर्फे फुटबाँलपटूंना किट देताना तुषार पाटील, आदित्य रेडेकर, प्रशांत दड्डीकर, अशोक कुरबेट्टी आदी.   (छाया : अवधूत चव्हाण ) 


गडहिंग्लज (प्रतिनिधी):  अखिल भारतीय फुटबाँल महासंघाने (एआयएफएफ) देशातील सर्वच व्यावसायिक संघाना १२, १५ आणि १८ वर्षाखालील संघ सक्तीचे केले आहेत. त्या धर्तीवर युनायटेडतर्फे ग्रामीण भागातील खेळाडूंना संधी मिळावी म्हणून असे संघ तयार करण्यात येत आहेत. यातील बारा वर्षाखालील २० खेळाडूंना साई एज्युकेशन ग्रुपचे विश्वस्त तुषार पाटील, युवा उद्योजक आदित्य रेडेकर, संघर्ष ग्रुपचे अशोक कुरबेट्टी, नवज्योतचे अध्यक्ष संतोष मांगले यांच्या प्रमुख उपस्थितीत किट वाटप करण्यात आले. एम. आर. हायस्कूलच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास खेळाडू, पालक उपस्थित होते.


गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनचे संचालक प्रशांत दड्डीकर यांनी स्वागत केले. युनायटेडचे सचिव दिपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविकात बारा वर्षाखालील डेव्हलपमेंट स्कॉडची अंतर्गत सुविधांची माहिती दिली. यावेळी श्रीराज सरदेसाई, आयान पटेल, कार्तिक चव्हाण यासह वीस नवोदित खेळाडूंना सरावासाठी प्रत्येकी दोन किट, पाण्याची बाटली असे क्रीडासाहित्य देण्यात आले.


उद्योजक आदित्य रेडेकर म्हणाले, ‘’प्रतिभावान नवोदित फुटबॉलपटूंच्या विकासासाठी राबविला जाणा-या या योजनेचा खेळाडूंनी लाभ उठवावा. खेळाबरोबरच संघभावना, लढण्याची वृत्ती, शिस्त अशी जीवन कौशल्ये विकसित करावीत’’ यावेळी आनंद पाटील, विजय रेडेकर, तानाजी देवेकर, सौरभ जाधव, ओमकार सुतार, प्रसाद पवार, आदर्श दळवी, पार्थ म्हैत्री यांच्यासह खेळाडू, पालक उपस्थित होते. श्रषीकेश भोसले यांनी आभार मानले.


पाच वर्षांची योजना


बारा वर्षाखालील खेळाडूसाठी हा डेव्हलपमेंन्ट स्कॉड हि संकल्पना राबविली जात आहे. या खेळाडूंना दर्जेदार किट, अत्याधुनिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. या नवोदित खेळाडूंना परराज्यातील नामवंत अकादमीत मित्रत्वाचे सामने खेळण्याची संधी मिळेल. या खेळाडूंना अधिकाधिक स्पर्धा खेळविण्याचे नियोजन आहे. सलग पाच वर्षे या सुविधा खेळाडूंना पुरविल्या जातील. यातील खेळाडूंना विविध अकादमीच्या निवड चाचणीतून शिष्यवृत्ती मिळवित शिक्षणासह प्रशिक्षणासाठी प्रोत्साहनाचे धोरण राहणार आहे.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.