Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे यांना 'डॉ.घाळी समाजभूषण' पुरस्काराने सन्मानित



गडहिंग्लज (संपत सावंत): समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार आणि देश घडविण्यामध्ये शिक्षण संस्थांचे स्थान मोठे आहे. आजच्या  व्यावसायिक युगात समाजाभिमुख शिक्षण देणाऱ्या संस्थेची स्थापना डॉ.घाळी यांनी केल्यामुळेच विविध क्षेत्रात नामवंत विद्यार्थी घडले. बेंगलोरमध्ये चांगले इंजिनियर होते म्हणून बेंगलोर आयटी पार्क साठी प्रसिद्ध झाले. यामुळे संस्थांनी आता आहे त्यात समाधानी न राहता आपली प्रतिमा अधिकाधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न वाढवावेत असे मत  डॉ. घाळी प्रतिष्ठान व विद्या प्रसारक मंडळाच्यावतीने आयोजित घाळी समाजभूषण पुरस्कार वितरणप्रसंगी पद्मश्री डॉ.प्रभाकर कोरे यांनी व्यक्त केले.



यावेळी श्री.दूरदुंडेश्वर सिद्ध संस्थान मठ , निडसोशीचे महास्वामीजी श्री.म.नि.प्र.जगद्गुरू डॉ.पंचम शिवलिंगेश्वर म्हणाले, अंकली या छोटयाशा खेडेगावामध्ये जन्मलेले डॉ. प्रभाकर कोरे यांनी सर्वसामान्य लोकांच्यासाठी शिक्षण देणारे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणसंस्था म्हणून के.एल.ई.शिक्षण संस्थेला नावारूपास आणले म्हणून त्यांचा हा डॉ. घाळी समाजभूषण पुरस्काराने केलेला गौरव समाजकार्य करण्यासाठी प्रेरणा देणारा आहे. पुढे त्यांनी, ग्रामीण  भागामध्ये खऱ्या अर्थाने शिक्षणाची ज्ञानगंगा पोहचविणारे खरे शिक्षणमहषी म्हणून डॉ.घाळी याचा उल्लेख करून डॉ.घाळी यांनी युवकांना ज्ञानदानाचे काम करून उज्ज्वल समाज घडविला आहे. के.एल.ई.सोसायटी बेळगावीचे कार्याध्यक्ष पद्मश्री डॉ.प्रभाकर कोरे  यांचा २५ हजार रोख, मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन डॉ. घाळी समाजभूषण पुरस्काराने गौरविले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश घाळी अध्यक्षस्थानी होते. माजी आमदार डॉ. एस. एस. घाळी यांच्या स्मृतीनिमित्त दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचे यंदाचे ३९ वे वर्ष आहे. डॉ.कोरे यांनी सदर पुरस्काराची २५ हजार रुपयांची रक्कम संस्थेतील गरीब, होतंकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी  संस्थेकडे सुपूर्द केले.



यावेळी डॉ. सतीश घाळी यांनी  अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या वाटचालीची माहिती दिली. कार्यक्रमाची स्वागत व प्रास्ताविक  गजेंद्र बंदी यांनी केले. यावेळी डॉ.कोरे यांच्या कार्यावर आधारित माहितीपट सादर करण्यात आले.मानपत्राचे वाचन प्राचार्य डॉ.दत्ता पाटील यांनी केले. यावेळी प्रा.आर.एस.सावेकर व संपत सावंत यांनी संपादीत केलेल्या "कर्मयोगातून समाजभूषणाकडे" या ई बुकचे प्रकाशन महास्वामीजींच्या हस्ते करण्यात आले.



यावेळी उपाध्यक्ष अरविंद कित्तूरकर, ॲड.विकास पाटील, डॉ. शिवकुमार कोल्हापूरे, इंजि.किशोर हंजी, महेश घाळी, संगाप्पाण्णा दड्डी, अशोक कंगुरी  बी..एन.पाटील गिजवणेकर, महादेव अण्णा साखरे, वैभव सावडेकर,किसनराव कुऱ्हाडे, स्वाती कोरी, नागेश चौगुले, महेश तुरबटमठ, वैषाली बागी, डॉ. विवेक पाटणे, राजेंद्र गड्यानावर, सुरेश कोळकी, ॲड. व्हि. एस.पाटील, मीनाताई कोल्हापूरे, बसवराज आजरी यांच्यासह वैद्यकीय, शिक्षण, सहकार क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. डॉ.सरोज बिडकर,शांभवी देसाई यांनी सूत्रसंचालन केले. सचिव ॲड. बी. जी. भोसकी यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.