Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'जागृती'चा सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत डंका; सिद्धी देसाई राज्यात तेरावी

सहा विद्यार्थी जिल्हा शिष्यवृत्तीधारक 




गडहिंग्लज (संपत सावंत) : विद्या प्रसारक मंडळ गडहिंग्लज,संचलित जागृती हायस्कूल येथील उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत आपल्या शैक्षणिक गुणवत्तेची उज्वल परंपरा कायम राखत प्रशालेचा निकाल तब्बल ७५ टक्के लागला असून परीक्षेत प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ३८ विद्यार्थी पास झाले असून सहा विद्यार्थी जिल्हा शिष्यवृत्ती धारक तर एका विद्यार्थिनींने राज्य गुणवत्ता यादीत स्थान पटकावले.



कु. सिद्धी देसाई हिने राज्य गुणवत्ता यादीत तेरावा क्रमांक मिळवत प्रशालेच्या शैक्षणिक लौकिकास मानाचा तुरा रोवला.जिल्हा  गुणवत्ता यादीत कु. श्रुतिका पाटील २८ वी, कु. सई भादवणकर ३५ वी, कु. स्वरा दिवेकर ६३ वी, कु. सागरीका सूर्यवंशी ९९वी, हर्ष नाईकवाडी ११२ वा क्रमांक मिळवत शिष्यवृत्तीधारक झाले.



या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष डॉ.सतीश घाळी, सहसचिव गजेंद्र बंदी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. सतीश घाळी म्हणाले, शिष्यवृत्तीचे हे यश केवळ एका परीक्षेतील गुणांचे यश नसून विद्यार्थ्यांच्या मेहनतीला, पालकांच्या विश्वासाला आणि शिक्षकांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाला मिळालेली पोचपावती आहे. आजच्या धावपळीच्या आव्हानात्मक परिस्थितीत मेहनत, जिद्द, शिस्त आणि योग्य मार्गदर्शन यांच्या जोरावर कोणतेही शिखर गाठता येते असे सांगितले. 


मुख्याध्यापक उमेश सावंत, उपमुख्याध्यापक अनिल मसाळे, पर्यवेक्षक महंतेश दड्डी यांचे प्रोत्साहन तर शिष्यवृत्ती विभाग प्रमुख प्रवीण सावंत, उपप्रमुख संपत सावंत, रवींद्र भंडारे ,अनिल कांबळे, सौ. लता संकपाळ,सौ. लक्ष्मी पाटील,सौ.डायना बार्देस्कर व राहुल वारके यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले. या दैदिप्यमान यशामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.