Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तेरणीत डॉ. एम. एस. पाटील यांच्या 'शिवशांती क्लिनिक' व 'शिवशांती मेडिकल'चे थाटात उद्घाटन

११५ हून अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी; २५ रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा सल्ला


ग्रामीण भागात सुसज्ज वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांतून समाधान




गडहिंग्लज (प्रतिनिधी ): येथील प्रसिद्ध डॉ. एम. एस. पाटील यांच्या 'शिवशांती क्लिनिक'चे नवे व सुसज्ज इमारतीत स्थलांतर तसेच फार्मासिस्ट सौ. भुवनेश्वर पाटील यांच्या नवीन 'शिवशांती मेडिकल'चा शानदार उद्घाटन सोहळा विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिराला परिसरातील रुग्णांचा उदंड प्रतिसाद मिळाला.



प्रारंभी अण्णासाहेब देसाई यांच्या हस्ते फीत कापून नूतन क्लिनिकचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. एम. एस. पाटील व फार्मासिस्ट सौ. भुवनेश्वरी पाटील यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि ग्रामस्थांचे शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत केले.



तेरणी व परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची नेहमीच आस्थापूर्वक काळजी घेणाऱ्या डॉ. एम. एस. पाटील यांनी रुग्णांच्या सोयीसाठी आणि आधुनिक आरोग्य सुविधा एकाच छताखाली पुरवण्यासाठी क्लिनिकचे स्थलांतर नव्या वास्तूत केले आहे. यासोबतच रुग्णांना दर्जेदार व माफक दरात तत्पर औषधोपचार उपलब्ध व्हावेत, यासाठी फार्मासिस्ट सौ. भुवनेश्वरी एम. पाटील यांच्या नेतृत्वाखाली 'शिवशांती मेडिकल' सेवा सुरू करण्यात आली आहे. याचाही प्रारंभ आज झाला.



या उद्घाटन सोहळ्यास वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह तेरणी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण भागात अशा प्रकारची सुसज्ज व अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व उपस्थितांनी डॉ. पाटील दांपत्याचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



यावेळी अण्णासाहेब देसाई, पंचायत समिती सदस्य स्वप्निल इंगवले, सरपंच रमेश पुजेरी, माजी सरपंच व विद्यमान सदस्य करवीर उथळे, अर्जुन कांबळे, सिद्धाना देसाई, बसवराज तेली, करवीर इंगवले, राजू इंगवले, माजी सरपंच अशोक मगदूम, इराप्पा चौगुले, चन्नबसप्पा अगसगी, डॉ. कपिल पाटील, किरण चौगुले, निवृत्त शिक्षक मारुती मगदूम, मुन्ना जमादार, विनायक नरेवाडी, राजू गंधनवाले, माजी सैनिक महेश पुजेरी, शंकर निंबाळकर, करवीर भोई, सिद्धाप्पा धनगर, निजगोंडा पाटील (खणदाळ) यांच्यासह डॉ. पाटील परिवार, विविध मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, दिवसभर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हॉस्पिटलला भेट देत डॉक्टर एम. एस.पाटील यांना शुभेच्छा दिल्या.



नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद 




कार्यक्रमाच्या निमित्ताने 'डॉ. अग्रवालस् आय हॉस्पिटल' यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर पार पडले. या शिबिरात तब्बल ११५ हून अधिक रुग्णांची डोळ्यांची मोफत तपासणी करण्यात आली. यात गरजू रुग्णांना अल्प दरात चष्मे वितरित करण्यात आले, तर २५ रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेची गरज असल्याचे निदान झाले.  सदर तपासणी डॉ. अग्रवालस् हॉस्पिटलच्या गिरीश ऐवाळे, सचिन रावळ, बबन कोकरे व सुभाष नवनाळे यांच्या तज्ज्ञ टीमने केली.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.