Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कोल्हापूरच्या न्यू कॉलेज ऑफ फार्मसीचा उंचगावात 'स्वच्छता उपक्रम'; एनएसएसच्या विद्यार्थ्यांकडून पथनाट्यातून प्रबोधन!



कोल्हापूर (प्रतिनिधी ): श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित न्यू कॉलेज ऑफ फार्मसी आणि ग्रामपंचायत उंचगाव यांच्या संयुक्त विद्यमाने १४ ऑगस्ट रोजी उंचगाव येथे 'स्वच्छता सप्ताहा'चे औचित्य साधून स्वच्छता अभियान अतिशय उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडले.



या अभियानांतर्गत महाविद्यालयाच्या डी. फार्मसी व बी. फार्मसीमधील राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) विद्यार्थ्यांनी मंगेश्वर मंदिर परिसर आणि गाव तलाव परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. केवळ परिसर स्वच्छ न करता, विद्यार्थ्यांनी स्थानिक नागरिकांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. स्वच्छता न राखल्यास त्याचा मानवी आरोग्यावर कसा घातक परिणाम होतो, याचे प्रभावी दर्शन विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या 'पथनाट्या'द्वारे घडवून आणले.



या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून लोकनियुक्त सरपंच मधुकर चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य नामदेव वाईगडे आणि रशीद पठाण उपस्थित होते. याशिवाय उंचगावच्या उपसरपंचांसह ग्रामपंचायत सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र कुंभार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्रा. वैशाली यादव, प्रा. काजल मोहिते, प्रा. अंजली महाडिक, प्रा. साक्षी माने, प्रा. राजेश कुलकर्णी व सौ. सीमा पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. या प्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि उंचगावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.