Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हलकर्णीत श्रावण सोहळ्यानिमित्त हळदी-कुंकू, मंगळागौर कार्यक्रम उत्साहात

हळदी-कुंकवाला महिलांची विक्रमी उपस्थिती; मंगळागौर व विविध खेळांनी सोहळ्याला रंगत




गडहिंग्लज (प्रतिनिधी):  जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर राजकुमार हत्तरकी यांच्या सौभाग्यवती सौ. कविता शिवशंकर हत्तरकी यांच्या वतीने हलकर्णी गावातील महिलांसाठी श्रावण सोहळ्यानिमित्त हळदी-कुंकू व मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


कार्यक्रमाची सुरुवात गावातील ज्येष्ठ महिलांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी हलकर्णी भाग हायस्कूल, हलकर्णी येथील महिला शिक्षिकांचा ५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त विशेष सत्कार करण्यात आला.


कार्यक्रमात गावातील महिलांनी पारंपरिक मंगळागौरीची गाणी व नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. महिलांनी उत्साहाने सहभाग घेतल्याने संपूर्ण वातावरण आनंदमय झाले होते. तसेच महिलांसाठी विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले. विविध खेळांमध्ये विजयी झालेल्या महिलांना आकर्षक भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. खेळांमध्ये सहभागी होत महिलांनी मनमुराद आनंद लुटला.


श्रावणातील पारंपरिक संस्कृती जपत महिलांना एकत्र आणणे, त्यांच्यातील स्नेह व आपुलकी वाढविणे आणि आनंदाचे क्षण अनुभवता यावेत, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा सोहळा मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात पार पडला.


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राची मुंगुरवाडी यांनी केले. तसेच हलकर्णी भाग हायस्कूलच्या शिक्षकांनी कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.