Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिक्षकांच्या पाद्यपूजनाने हरळी खुर्दच्या हिरण्यकेशी विद्यालयात शिक्षक दिन साजरा



गडहिंग्लज (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देणाऱ्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत हरळी खुर्द येथील हिरण्यकेशी विद्यालयात ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात  साजरा करण्यात आला. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात शिक्षकांचे पाद्यपूजन करून त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त करण्यात आला.



विद्यालयाचे मुख्याध्यापक महादेव जाधव यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जागृती शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्रा. डी. के. माने उपस्थित होते.


शिक्षक दिनाचे औचित्य साधून छात्राध्यापक गटाने शाळेच्या व्यवस्थापनाची सूत्रे हाती घेतली होती. यामध्ये अभिरूप मुख्याध्यापिका म्हणून स्वप्नाली बावचे, अभिरूप उपमुख्याध्यापिका जयश्री साळवी, पर्यवेक्षक स्वाती पोवार, खजिनदार अस्मिता कुंभार, ५ वी वर्गशिक्षिका काजल देसाई, ७ वी वर्गशिक्षिका रुपाली साळुंखे आणि ९ वी वर्गशिक्षिका श्वेता न्हावी यांनी जबाबदारी सांभाळली. या सर्व छात्राध्यापकांनी मिळून संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके आयोजन केले.


कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिक्षकांबद्दल आपले मनोगत व्यक्त केले आणि त्यांना पुष्प देऊन सन्मानित केले. 'माझ्या जीवनातील आदर्श शिक्षक' या विषयावर विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषणे केली.


मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक महादेव जाधव यांनी शिक्षकाचे समाजातील स्थान आणि डॉ. राधाकृष्णन यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. छात्राध्यापकांनी हा काळ कसा जपावा याबद्दल मोलाचा सल्ला दिला. प्रमुख पाहुणे प्रा. डी. के. माने यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार अभिरूप उपमुख्याध्यापिका जयश्री साळवी यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.