Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तालुक्यावर विजयाची मोहर, आता जिल्ह्याच्या मैदानावर झेप!

तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत साई इंटरनॅशनल स्कूलच्या १४ वर्षांखालील मुलींचा दणदणीत विजय


जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड





गडहिंग्लज ( प्रतिनिधी): कौशल्यपूर्ण खेळ, अजोड संघभावना आणि विजयाची दुर्दम्य जिद्द यांच्या जोरावर 'साई इंटरनॅशनल स्कूल'च्या १४ वर्षांखालील मुलींच्या संघाने तालुकास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले. अंतिम सामन्यात दाखवलेल्या थरारक कामगिरीच्या बळावर संघाने जिल्हास्तरीय स्पर्धेत धडक मारली आहे.


अंतिम सामन्यात रोमांचक थरार


गडहिंग्लज तालुकास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धा २०२६ मध्ये साई इंटरनॅशनल स्कूल एमआयडीसी गडहिंग्लज आणि सर्वोदय स्कूल यांच्यात अंतिम सामना रंगला. दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. निर्धारित वेळेत सामना बरोबरीत राहिल्याने पेनल्टी स्ट्रोकचा अवलंब करण्यात आला. या दडपणाच्या क्षणी साई इंटरनॅशनलच्या खेळाडूंनी कमालीचा संयम आणि आत्मविश्वास दाखवत सर्वोदय स्कूलचा ४-२ असा पराभव केला आणि विजेतेपदावर आपले नाव कोरले.


जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ सज्ज


तालुकास्तरावर मिळवलेल्या या शानदार विजयामुळे साई इंटरनॅशनल स्कूलच्या १४ वर्षांखालील मुलींच्या संघाची 'जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धे'साठी निवड झाली आहे. तालुक्यावर विजयाची मोहर उमटवल्यानंतर आता हा संघ जिल्ह्याच्या मैदानावर चमकदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे.


मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव


संघाच्या या ऐतिहासिक यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष  सतीश पाटील, उपाध्यक्ष  बाळासाहेब घुगरे, संचालक  तुषार पाटील आणि प्राचार्या सौ. सुजाता नागराळे यांनी खेळाडू विद्यार्थिनी व क्रीडा शिक्षक  ओंकार सुतार यांचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.