Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तेरणी येथे ‘श्री जय भारत’ दूध संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा संस्थेच्या वतीने विशेष सत्कार




गडहिंग्लज (प्रतिनिधी): तेरणी येथील श्री जय भारत सहकारी दूध व्यावसायिक संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज विठ्ठल मंदिरात अत्यंत शांततेत आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. प. पू. श्री सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी (मरळसिद्धेश्वर मठ, उ. खानापूर) यांच्या मंगलमयी उपस्थितीत आणि संस्थेचे चेअरमन भूषणबाबू इंगवले यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली.


सभेच्या सुरुवातीला गावाचा गौरव वाढवणाऱ्या गुणवंतांचा स्वामीजींच्या शुभहस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये भारतीय सैन्य दलात प्रदीर्घ सेवा बजावून ‘ऑर्डिनरी कॅप्टन’ पदावरून निवृत्त झालेले इराप्पा केदारी फडके, पी.एचडी. पदवी प्राप्त केल्याबद्दल प्रा. डॉ. मोहसीन मुल्ला तसेच केंद्रप्रमुख म्हणून निवड झाल्याबद्दल करवीर गोरे यांचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.



वार्षिक सभेच्या मुख्य कामकाजात संस्थेच्या वार्षिक अहवालाचे वाचन राजू गंधनवाले यांनी केले. त्यानंतर विषयपत्रिकेवरील सर्व विषयांवर सभासदांनी सविस्तर चर्चा केली. संस्थेच्या उत्कर्षासाठी व दुग्ध उत्पादकांच्या हितासाठी मांडण्यात आलेले सर्व ठराव सर्वानुमते व एकमताने मंजूर करण्यात आले.



या प्रसंगी संस्थेच्या व्हाईस चेअरमन सौ. मालुताई जाधव, संचालक दुंडाप्पा नरेवाडी, करवीर मगदूम, केदारी फगरे, बाळासो निंबाळकर, गुलाब मुल्ला, रवींद्र इंगवले, सौ. शांता मगदूम, सचिव महादेव इंगवले, मारुती मांगले आणि इम्रान देसाई यांच्यासह संस्थेचे सर्व सभासद व दुग्ध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांच्या सक्रिय सहभागाने आणि सहकार्याच्या भावनेने ही सभा अत्यंत उत्साहात पार पडली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.