Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजमधील विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना मिळणार नवी भरारी; ‘जिद्द अभ्यासिका’चा दिमाखदार शुभारंभ!

स्पर्धा परीक्षा व शैक्षणिक तयारीसाठी विद्यार्थ्यांना मिळणार अभ्यासाचे शिस्तबद्ध वातावरण




गडहिंग्लज (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला नवी दिशा देणाऱ्या आणि त्यांच्या यशाचा मार्ग सुकर करणाऱ्या 'जिद्द अभ्यासिका'चा भव्य व दिमाखदार उदघाटन सोहळा नुकताच अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. क्रिएटिव्ह नर्सिंग व स्वराज जीएनएम महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. हिरेमठ यांच्या हस्ते या अभ्यासिकेची फित कापून सुरुवात करण्यात आली.


विशेष म्हणजे, गडहिंग्लजमधील प्रसिद्ध जी. एस. पाटील क्लासेस सुरू करण्यासाठी प्रेरणास्थान ठरलेल्या डॉ. हिरेमठ यांच्याच हस्ते या जिद्दीतून साकारलेल्या अभ्यासिकेचे उदघाटन झाल्याने या सोहळ्याला एक वेगळीच भावनात्मक व शैक्षणिक महत्ता प्राप्त झाली.



या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून ग्राम महसूल अधिकारी श्री. कळसगोंडा, मुगळी गावचे सामाजिक कार्यकर्ते शिवराज कटकोळे, जिद्द अभ्यासिकेचे संचालक व प्रमुख शंकर हिरेमठ, जी. एस. पाटील क्लासेसचे प्रमुख जी. एस. पाटील यांच्यासह परिसरातील शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



अभ्यासासाठी सर्वसोयींनी युक्त वातावरण


स्पर्धा परीक्षा, विविध व्यावसायिक कोर्सेस आणि शालेय व महाविद्यालयीन परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एकाग्रतेने अभ्यास करता यावा, यासाठी अत्यंत शांत, शिस्तबद्ध आणि समृद्ध अभ्यासपूरक वातावरण 'जिद्द अभ्यासिका'मध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. जिद्द, मेहनत आणि सातत्य या त्रिसूत्रीच्या जोरावर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला या अभ्यासिकेमुळे मोठी चालना मिळेल, असा विश्वास उदघाटन प्रसंगी उपस्थितांनी व्यक्त केला.


गडहिंग्लज व परिसरातील विद्यार्थ्यांनी या सुसज्ज अभ्यासिकेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आले आहे. या कौतुकास्पद शैक्षणिक उपक्रमाचे शहर व परिसरातून जोरदार स्वागत होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.