Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा उत्साहात; १०६ मुलांचा सहभाग; विजेत्यांची जिल्हास्तरांवर निवड


ए.डी. शिंदे कॉलेज, भडगाव येथे पार पडल्या स्पर्धा 


गडहिंग्लज ( संपत सावंत): गडहिंग्लज तालुका शालेय शासकीय कुस्ती स्पर्धा ए.डी. शिंदे कॉलेज, भडगाव येथे उत्साहात पार पडल्या. १४,१७ व १९ वर्षाखालील मुला- मुलींनी विविध वजनी गटात १०६ खेळाडूंनी सहभाग घेतला. त्यातील ३३ खेळाडूंची  दत्त सेवा विद्यालय, तुरुकवाडी (ता. शाहूवाडी) येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.


स्वागत व प्रास्ताविक स्पर्धा प्रमुख प्रा. देवदत्त पाटील यांनी केले. स्पर्धेचे उद्घाटन गडहिंग्लजचे माजी उपनगराध्यक्ष महेश कोरी, प्राचार्य डॉ. डी.व्ही घेवडे, प्राचार्य डॉ. एस. एन. कुरबेट्टी, प्राचार्य डॉ. सागर कुंभार यांच्या हस्ते झाले. यावेळी क्रीडा समन्वयक विनायक नाईक, पै. शंकर कुरळे ,अनिल पाटील, सुनील रेडेकर, जयवंत पाटील, दयानंद ग्वाडी, सुभाष तिप्पे,अमित नंद्यानावर, सुरेश पाटील उपस्थित होते. महेश कोळशरी यांचे भाषण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपत सावंत यांनी तर आभार पै.सागर शिंदे यांनी मानले.


जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेले फ्री स्टाईल खेळाडू असे -

मुले - शिवराज मातले (कडगाव), ऋतिक पाटील(मुत्नाळ) , सुयोग पाटील (जागृती), मयूर मनगुत्ती ( नंदनवाड), प्रथमेश पाटील (नूल), वेदांत गल्ली( जागृती), अर्णव खराडे (जागृती), शंभुराजे राक्षे (जागृती), प्रथमेश जाधव (करंबळी), श्रेय चवणाळे (नंदनवाड), अथर्व पाटील (जागृती), श्रेयस सावेकर (नंदनवाड ),आयुष्य खराडे (करंबळी), पृथ्वीराज पाटील( जागृती), रुद्र इंचनाळे( मुंगुरवाडी), समर्थ शेलार (एम. आर), तनिष्क आंबी (नूल), केशव कुरळे (संभाजीराव माने), पार्थ गौड( नेसरी), साहिल सावंत (नेसरी) विश्वजीत मातले (संभाजीराव माने) अथर्व पाटील (नेसरी)



मुली- कुमारी भूमिका पाटील (बसर्गे), कुमारी प्रांजल भोसले (नंदनवाड), कुमारी वल्लरी भोगण (हलकर्णी), कुमारी कावेरी पाटील (बसर्गे ),कुमारी संयोगिता गोरुले( हरळी), कुमारी मानवी येणेचीवंडीकर (नंदनवाड) कुमारी श्रेया सावेकर (नंदनवाड),कुमारी श्रेया बिरंजे (नंदनवाड), कुमारी वैभवी नाईक( नंदनवाड), कुमारी श्रावणी रायापगोळ(नंदनवाड), कुमारी सानवी कापसे (जागृती जुनि.)


स्पर्धेसाठी पंच म्हणून पै. शंकर कुरळे ,पै. बाजीराव कदम, पै.शंकर घुगरे, पै. रवी डोंगरे,पै. प्रमोद खांडेकर,पै. उमेश खांडेकर यांनी काम केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.