Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवसेना पक्षातील अभ्यासू आणि निष्ठावंत स्तंभ हरपला: जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे

सामान्यांच्या पाठीशी उभे राहणारे नेतृत्व गमावलो : तालुकाप्रमुख अजित खोत


मनमिळाऊ आणि एकनिष्ठ नेतृत्वाला मुकलो: उपतालुकाप्रमुख वसंत नाईक


डॉ. रियाजभाई शमनजी यांना शिवसेना पदाधिकाऱ्यांची श्रद्धांजली 




गडहिंग्लज (प्रतिनिधी) : शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) सह संपर्कप्रमुख डॉ. रियाजभाई शमनजी यांच्या निधनाने शिवसेना पक्षावर शोककळा पसरली असून पक्षातील विविध पदाधिकाऱ्यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत.


"डॉ. रियाजभाई शमनजी यांच्या निधनाने शिवसेना कुटुंबातील एक अत्यंत संयमी, अभ्यासू आणि निष्ठावंत नेतृत्व आपण गमावले आहे. सह संपर्कप्रमुख म्हणून काम करताना त्यांनी संघटना तळागाळात पोहोचवण्यासाठी आणि सामाजिक सलोखा जपण्यासाठी मोलाचे योगदान दिले. त्यांचा जनसंपर्क आणि कार्यपद्धती आम्हा सर्वांसाठी नेहमीच मार्गदर्शक राहिली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि शमनजी परिवाराला या दुःखातून सावरण्याचे बळ देवो." अशी शोक भावना शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांनी व्यक्त केली आहे.


सामान्यांच्या पाठीशी उभे राहणारे नेतृत्व गमावलो : तालुकाप्रमुख अजित खोत


डॉ. रियाजभाई शमनजी यांच्या जाण्याने आपल्या तालुक्याने आणि शिवसेना पक्षाने एक सच्चा, मार्गदर्शक गमावला आहे. सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमी तत्पर असायचे. संघटनावृद्धीसाठी त्यांनी घेतलेले कष्ट आणि शिवसैनिकांना दिलेली साथ आम्ही कधीही विसरू शकत नाही. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणारी नाही. अशी शोक भावना शिवसेनेचे तालुकाप्रमुख अजित खोत यांनी व्यक्त केली आहे. 


मनमिळाऊ आणि एकनिष्ठ नेतृत्वाला मुकलो: उपतालुकाप्रमुख वसंत नाईक


डॉ. रियाजभाई शमनजी यांचे अचानक सोडून जाणे हा आमच्यासाठी वैयक्तिक आणि पक्षासाठी मोठा धक्का आहे. अत्यंत मनमिळाऊ स्वभाव, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती आणि पक्षाशी असलेली त्यांची एकनिष्ठता कायम स्मरणात राहील. एका सच्चा शिवसैनिकाला आणि मार्गदर्शकाला आपण मुकलो आहोत. अशी शोक भावना शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख वसंत नाईक यांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.