Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

युनिव्हर्सल फ्रेंड्स सर्कल मार्फत साधना प्रशालेत 'मोबाईलचा वापर आणि दुष्परिणाम'वर व्याख्यान



गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील युनिव्हर्सल फ्रेंड्स सर्कलच्या वतीने साधना प्रशालेत 'मोबाईलचा वापर आणि दुष्परिणाम' या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. अमित कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधत मार्गदर्शन केले.


मोबाईलचा अतिवापर हा अभ्यासातील एकाग्रता, शारीरिक व मानसिक आरोग्यावर कसा विपरीत परिणाम करतो, याबाबत प्रा. कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. स्क्रीन टाइमवर नियंत्रण, सोशल मीडियाचा मर्यादित वापर आणि अभ्यासासाठी तंत्रज्ञानाचा सकारात्मक उपयोग याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाच्या टिप्स दिल्या. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रश्न विचारत चर्चेत सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जॉन्सन सोज यांनी केले.

यावेळी प्रशालेचे प्राचार्य अरविंद बारदेस्कर, पर्यवेक्षक बी.एन. वाघमारे, तसेच सुभाष चोथे, विरुपाक्ष पाटणे, अमित इंगळे, शिवप्रसाद दड्डी, विजय खावरे, प्रशांत हिरेमठ, प्रशांत शिंदे, महांतेश इंगळी, श्रीनिवास वेर्णेकर, अभिजित नाईकवाडे यांच्यासह शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.