Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज आणि कागल तालुका दुष्काळ आराखड्यात समाविष्ट करा!

ठाकरे शिवसेनेची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी, निवेदन सादर 




कोल्हापूर :  राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळ आराखड्यातून गडहिंग्लज आणि कागल या दोन तालुक्यांना वगळल्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र असंतोष पसरला आहे. या दोन्ही तालुक्यांचा तत्काळ दुष्काळ आराखड्यात समावेश करावा, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने उपनेते संजय पवार, जिल्हा प्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरच्या जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.


निवेदनात नमूद केल्यानुसार, राज्य सरकारने राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर केली असून त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील सहा तालुक्यांचा समावेश आहे. परंतु, गडहिंग्लज विभागात आजरा, चंदगड, भुदरगड, राधानगरी या तालुक्यांचा समावेश असताना गडहिंग्लज तालुक्याला वगळणे अनाकलनीय आहे. अंतिम टप्प्यात पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगाम पूर्णपणे धोक्यात आला असून शेतकरी अस्वस्थ आहेत. दुष्काळ जाहीर झाल्यास मजुरांच्या हाताला काम आणि कष्टकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. हीच परिस्थिती कागल तालुक्यातही असून तेथील पिकेही धोक्यात आली आहेत.


शासनाने या दोन्ही तालुक्यांचा दुष्काळ आराखड्यात समावेश न केल्यास नाईलाजाने शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा ठाकरे शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.



या प्रसंगी उपनेते संजय पवार, जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, संभाजी भोकरे, तालुकाप्रमुख अजित खोत, युवराज पोवार, जयसिंग टिकले, गणेश बागडी, युवासेना जिल्हाप्रमुख अवधुत पाटील, महिला जिल्हा संघटक सौ. शांता जाधव, ग्राहकसेना जिल्हासंघटक दिनेश कुंभीरकर, विधानसभा संघटक अनिता पाटील यांच्यासह महेश पाटील, किरण नागुडेंकर, मारूती पुरीबुवा, संजय पाटील, रविंद्र पाटील, उत्तम शेटके, विक्रम पाटील, दिग्विजय पाटील, दिलीप पाटील, सुरेश हेब्बाळे व शिवाजी पाटील आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.