Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिक्षणाबरोबरच पुस्तकाच्या बाहेरचे जग बघण्याची दृष्टी आपल्यामध्ये विकसित झाली पाहिजे - प्रा.सुषमा पाटील

गडहिंग्लजला संभाजीराव माने जुनिअर कॉलेजच्या अकरावी कॉमर्सच्या नवागत विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ

 



गडहिंग्लज (प्रतिनिधी ): यशाला कोणतेही शॉर्टकट नाही. विद्यार्थ्यांनी अभ्यासातून आपले आयुष्य घडवण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. रोजच्या शिक्षणाबरोबरच पुस्तकाच्या बाहेरचे जग बघण्याची दृष्टी आपल्यामध्ये विकसित झाली पाहिजे. असे प्रतिपादन मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्रा. सुषमा पाटील यांनी केले. 


येथील संभाजीराव माने जुनिअर कॉलेजच्या अकरावी कॉमर्स च्या नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार ऋषिकेश शेळके यांची उपस्थिती लाभली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस. एम. कदम होते तर संस्थेचे उपाध्यक्ष अॅड.दिग्विजय कुराडे व संचालिका, नगरसेविका प्रा. सौ. बिनादेवी कुराडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रारंभी उपप्राचार्य तानाजी चौगुले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय प्रा.गीतादेवी देसाई यांनी करून दिला.


या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रा. पाटील पुढे म्हणाल्या- कॉलेज जीवनातच आपल्या जीवनाला कलाटणी मिळते तसेच आपले जीवन घडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिले पाहीजे. विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातील पुस्तकांच्या सानिध्यात राहून आपल्या ज्ञानाची क्षमता वाढवली पाहिजे. आपल्यातील क्षमता आणि कौशल्य वाढविण्यावर भर घातली पाहिजे. त्याकरिता आपल्याला कष्टाची जाणीव असणे काळजी गरज आहे. आज आपण शिकत असताना प्रथम नम्र व्हायला व कृतज्ञ राहायला शिकले पाहिजे. आपले आई-वडील आणि समाजाने दिलेले संस्कार घेतले पाहिजे. विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक भावनिक व आध्यात्मिक क्षमता विकसित होणे काळाची गरज आहे. कारण क्षमता आणि कौशल्य असलेली माणसे जीवनात कुठेही कमी पडत नाहीत. आजच्या विद्यार्थ्यांनी गुणपत्रिकेबरोबर कौशल्य मिळवणे महत्त्वाचे आहे. गुणवत्तेच्या जोरावरच आपण आयुष्य घडवले पाहिजे त्यासाठी चांगल्या संगतीत राहिले पाहिजे. ग्रंथालयातील पुस्तके वाचून आपली बौद्धिक क्षमता वाढवली पाहिजे. असे स्पष्ट करून प्रा.सुषमा पाटील यांनी आज आपल्या आपल्यासमोर अनेक आदर्श आहेत. आज आपल्याला गुणवत्ता महत्वाची आहे आणि चारित्र्यवाण बनले पाहिजे. कॉलेजमध्ये गुरूंच्या सानिध्यात राहून आपले करिअर घडवले पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केले. 


यावेळी तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संस्थेचे उपाध्यक्ष अॅड.दिग्विजय कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम, आप्पासाहेब गायकवाड हायस्कूल महागोंडचे मुख्याध्यापक श्री दीपक कांबळे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. धीरज सागर व वैष्णवी फडके या विद्यार्थ्यांनी  आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास अत्याळ हायस्कूलचे शिक्षक श्री मधुकर पाटील, महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्त्या सौ रेखा पोतदार यांच्यासह प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जयवंत पाटील व प्रा. तानाजी भांदुगरे यांनी केले तर आभार प्रा.आशा पाटील यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.