Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवराज महाविद्यालयात जागतिक नारळ दिनानिमित्त पाककला स्पर्धा संपन्न



गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागाच्यावतीने जागतिक नारळ दिनानिमित्त आयोजित नारळाच्या खोबऱ्यापासून बनविलेल्या पदार्थांच्या पाककला स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेचे उदघाटन प्राचार्य डॉ. एस.एम. कदम व संचालक प्रा. विश्वजीत कुराडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी डॉ.ज्योती गोरुले यांनी स्वागत करून प्रास्ताविकात या स्पर्धेच्या संयोजनाबाबत माहिती दिली.



यावेळी घेण्यात आलेल्या पाककला स्पर्धेमध्ये-प्रथम क्रमांक-वर्षा मलगोंडा पाटील, व्दितीय-अनुजा शैलेश कुलकर्णी, तृतीय-पूनम शिवाजी बस्ताडे, उत्तेजनार्थ-पल्लवी किरण गावडा, समीक्षा विठ्ठल जाधव, तृप्ती महेंद्र लोहार, संचिता जयराम संकपाळ या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कमेची बक्षिसे देऊन सन्मानीत करण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ.सानिया तेंडूलकर आणि प्रा.विद्या पाटील यांनी केले. नॅक समन्वयक प्रा.किशोर अदाटे, डॉ.विद्या देशमुख, प्रा.श्रीधर सावेकर, डॉ.प्रतिमा कांबळे, डॉ.ओंकार कोष्टी आदीसह विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.