Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांना मोठा दिलासा, १२ प्रमुख सवलतींसह तातडीने पंचनाम्यांचे आदेश!



मुंबई: सन २०२६ च्या खरीप हंगामात पावसाने पाठ फिरवल्याने आणि निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीमुळे त्रस्त झालेल्या बळीराजाला राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये ‘Trigger-1’ (प्रथम कळ) अंतर्गत अधिकृतपणे दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यासंदर्भात मदत व पुनर्वसन विभागाने २५ सप्टेंबर २०२६ रोजी शासन निर्णय (GR) निर्गमित केला असून, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना बाधित क्षेत्रातील पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.


कृषी आयुक्तांनी २४ सप्टेंबर रोजी सादर केलेल्या अहवालानुसार, जून ते सप्टेंबर या काळात पाऊस अत्यंत अपुरा पडल्यामुळे पिकांची अतोनात हानी झाली आहे. त्यामुळे दुष्काळ व्यवस्थापन संहिता-२०१६ च्या निकषानुसार पहिल्या टप्प्यातील सवलती तात्काळ लागू करण्यात आल्या आहेत.


शेतकऱ्यांसाठी जाहीर झालेल्या १२ प्रमुख सवलती व उपाययोजना


१. जमीन महसुलात पूर्ण सूट: बाधित भागातील शेतकऱ्यांना या वर्षाचा जमीन महसूल माफ करण्यात आला आहे.

२. पीक कर्जाचे पुनर्गठन: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे तातडीने पुनर्गठन केले जाईल.

३. कर्ज वसुलीस स्थगिती: शेतीशी निगडित सर्व प्रकारच्या कर्जाच्या वसुलीस तात्काळ स्थगिती देण्यात आली आहे.

४. कृषी पंप वीजबिलात सवलत: ७.५ हॉर्सपावरपेक्षा जास्त क्षमतेच्या कृषी पंपांच्या चालू वीजबिलात विशेष सूट मिळेल (७.५ एचपी पर्यंतचे बिल आधीच माफ आहे).

५. परीक्षा शुल्क माफी: बाधित क्षेत्रातील शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क पूर्णपणे माफ केले जाईल.

६. रोजगार हमी (मनरेगा): रोहयो कामांच्या निकषात शिथिलता आणून स्थानिकांना जास्तीत जास्त कामे उपलब्ध करून दिली जातील.

७. पिण्याचे पाणी व टँकर: पाण्याचा तुटवडा असलेल्या गावांमध्ये आवश्यकतेनुसार तातडीने पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू केले जातील.

८. वीज जोडणी कापणार नाही: टंचाईग्रस्त गावांमध्ये कोणत्याही शेतकऱ्याच्या शेती पंपाचे वीज कनेक्शन खंडित केले जाणार नाही.

९. अन्नधान्य सुरक्षा: शेतकरी व शेतमजुरांना अन्नाची टंचाई भासू नये म्हणून विशेष अन्नधान्य वितरण व्यवस्था राबवली जाईल.

१०. चारा व पाणी व्यवस्थापन: पशुधनासाठी चारा छावण्या व पाण्याच्या नियोजनावर विशेष भर दिला जाईल.

११. जलसंधारणाची कामे: दुष्काळी तालुक्यांमध्ये जलसंधारणाची कामे प्राधान्याने हाती घेतली जातील.

१२. पाण्याचे काटेकोर नियोजन: पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याचे पूर्वीच्या निर्देशांनुसार काटेकोर नियोजन केले जाईल.



GPS आणि फोटोंसह तात्काळ पंचनाम्यांचे आदेश


शासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत की, त्यांनी बाधित पिकांचे पंचनामे करताना GPS कोऑर्डिनेट्स आणि पिकांच्या सद्यस्थितीचे स्पष्ट फोटो संकलित करावेत. हा अहवाल कृषी आयुक्तांमार्फत शासनास तातडीने सादर केला जाईल. ही विहित प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना शेतपिकांच्या नुकसानीपोटी थेट आर्थिक मदत देण्याबाबत स्वतंत्र शासन निर्णय जारी केला जाणार आहे.


दुष्काळ  लागू झालेल्या जिल्ह्यातील तालुक्यांची यादी:


१. नाशिक विभाग (५३ तालुके):


नाशिक:मालेगाव, बागलाण, कळवण, नांदगाव, सुरगणा, इगतपुरी, पेठ, सिन्नर, येवला, देवळा.

धुळे: धुळे, साक्री, सिंदखेडा, शिरपूर.

जळगाव: एरंडोल, पारोळा, धरणगाव, चोपडा, पाचोरा, जामनेर, जळगाव, भडगाव, अमळनेर, रावेर, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर, यावल.

नंदुरबार:अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर, तळोदा, अक्राणी.

अहिल्यानगर: नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर, रहाता.


२. पुणे विभाग (३५ तालुके):


पुणे: भोर, वेल्हा, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर.

सोलापूर: उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा.

सांगली: मिरज, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ.

सातारा:सातारा, खटाव, माण, फलटण, खंडाळा, महाबळेश्वर.

कोल्हापूर: पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, आजरा, चंदगड.


३. छत्रपती संभाजीनगर विभाग (७४ तालुके):


छत्रपती संभाजीनगर: छ. संभाजीनगर, कन्नड, सोयगाव, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, फुलंब्री.

जालना: बदनापूर, घनसावंगी, अंबड, जालना, परतूर, मंठा, भोकरदन, जाफ्राबाद.

बीड: बीड, गेवराई, माजलगाव, केज, आंबेजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, धारूर, वडवणी.

लातूर: लातूर, औसा, अहमदपूर, निलंगा, उदगीर, चाकूर, रेणापूर, शिरूर अनंतपाळ, देवणी, जळकोट.

धाराशिव: धाराशिव, कळंब, भूम, वाशी, तुळजापूर, लोहारा, परांडा, उमरगा.

नांदेड: नांदेड, बिलोली, कंधार, लोहा, हदगाव, भोकर, देगलूर, किनवट, हिमायतनगर, माहूर, धर्माबाद, उमरी, अर्धापूर, नायगाव.

परभणी: पूर्णा, पालम, परभणी, सोनपेठ, जिंतूर, गंगाखेड, सेलू, मानवत, पाथरी.

हिंगोली: हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव, वसमत.


४. अमरावती विभाग (५६ तालुके):


बुलढाणा: जळगाव जामोद, संग्रामपूर, चिखली, देऊळगाव राजा, मेहकर, बुलढाणा, सिंदखेड राजा, लोणार, खामगाव, शेगाव, मलकापूर, मोताळा, नांदुरा.

अमरावती: अमरावती, भातकुली, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, तिवसा, धारणी, चिखलदरा, वरुड, मोर्शी, चांदूर बाजार, दर्यापूर.

अकोला: अकोट, अकोला, पातूर, तेल्हारा, मूर्तिजापूर, बाळापूर, बार्शीटाकळी.

वाशीम: वाशीम, रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा, मानोरा.

यवतमाळ: यवतमाळ, बाभुळगाव, कळंब, दारव्हा, दिग्रस, आर्णी, नेर, पुसद, उमरखेड, महागाव, वणी, मारेगाव, झरी जामणी, केळापूर, घाटंजी, राळेगाव.


५. नागपूर विभाग (३९ तालुके):


वर्धा: वर्धा, सेलू, देवळी, आर्वी, समुद्रपूर, हिंगणघाट, आष्टी.

नागपूर: नागपूर, कामठी, सावनेर, पारशिवनी, मौदा, भिवापूर, कळमेश्वर, काटोल, रामटेक, हिंगणा, उमरेड, कुही, नरखेड, नागपूर शहर.

भंडारा: भंडारा, पवनी, लाखंदूर.

गोंदिया : तिरोडा.

चंद्रपूर: चंद्रपूर, भद्रावती, गोंडपिंपरी, राजुरा, कोरपना, मूल, वरोरा, सावली, चिमूर, नागभीड, सिंदेवाही, पोंभूर्णा.

गडचिरोली: गडचिरोली, चामोर्शी.


६. कोकण विभाग (१२ तालुके):


रायगड:श्रीवर्धन.

रत्नागिरी: रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर.

सिंधुदुर्ग: सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली, कुडाळ, वैभववाडी, मालवण, देवगड, वेगुर्ला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.