संगोपन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या वतीने आयोजन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): "आरोग्याची सुरक्षा, कुटुंबाची सुरक्षा आणि महिलांचे आरोग्य हेच राष्ट्राचे भविष्य" या बोधवाक्याला अनुसरून नरेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील संगोपन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आणि मुंबई ऑन्को कॅन्सर केअर अँड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी विशेष मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात महिलांमधील गंभीर आजारांचे वेळेत निदान व्हावे, यासाठी महत्त्वाच्या चाचण्या पूर्णपणे मोफत केल्या जाणार आहेत. दिनांक ८, ९, १०, ११ आणि १२ सप्टेंबर या कालावधीत सकाळी ११:०० ते दुपारी ४:०० वाजेपर्यंत हे शिबिर पार पडणार आहे.
६ हजार रुपयांच्या चाचण्या होणार मोफत
खाजगी रुग्णालयांमध्ये साधारण ६,००० रुपये खर्च येणारी महिलांच्या स्तनाची तपासणी (मॅमोग्राफी) आणि गर्भाशयाच्या मुखाची तपासणी (पॅप स्मिअर) या शिबिरात पूर्णपणे मोफत केली जाणार आहे. ४० वर्षांवरील महिलांसाठी ही तपासणी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. शिबिरात महिला तज्ज्ञ डॉक्टरांकडून पूर्णतः सुरक्षित आणि स्वच्छ वातावरणात तपासणी केली जाईल. तसेच तपासणीपूर्वी व तपासणीनंतर मोफत मार्गदर्शन केले जाणार असून वैद्यकीय अहवालाची (रिपोर्ट) पूर्ण गोपनीयता बाळगली जाईल.
पूर्व नोंदणी अत्यंत आवश्यक!
शिबिरात सुसूत्रता राहावी यासाठी पूर्व नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. दररोज फक्त ३० महिलांचीच मॅमोग्राफी तपासणी केली जाणार आहे. नोंदणी करतानाच तपासणीची तारीख निश्चित करावी लागेल. ज्या दिवशी नोंदणी आहे, त्याच दिवशी तपासणी केली जाईल. पूर्व नोंदणी नसणाऱ्या महिलांची तपासणी केली जाणार नाही. तपासणी केल्यानंतर एका आठवड्याने रिपोर्ट दिला जाणार आहे. या सुवर्णसंधीचा गडहिंग्लज आणि परिसरातील अधिकाधिक महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क:
मोबाईल क्रमांक: 9145440042 / 9145440044

