Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

दुष्काळी परिस्थिती घोषित केलेल्या २६५ तालुक्यांतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीसोबतच इतर मदतीसाठी विद्यापीठ स्तरावर टास्क फोर्स स्थापन करावा

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

   



मुंबई :  राज्यातील दुष्काळी परिस्थिती घोषित केलेल्या भागातील कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण आर्थिक अडचणींमुळे थांबू नये, याची काळजी घेणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. दुष्काळी परिस्थिती घोषित केलेल्या २६५ तालुक्यांतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीसोबतच इतर मदतीसाठी विद्यापीठ स्तरावर टास्क फोर्स स्थापन करावा असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.



उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांचे कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव तसेच महाविद्यालयांच्या प्राचार्यांची ऑनलाइन आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीस विभागाचे अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी आणि उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर उपस्थित होते.


मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, मदत व पुनर्वसन विभागाने राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित भागातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या परीक्षा शुल्क माफीबाबत उच्च शिक्षण संचालनालयाने परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणाऱ्या प्रथम सत्राच्या परीक्षांसाठी पात्र विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारू नये.


            

मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, फक्त शासन निर्णयाची अंमलबजावणी करून थांबू नये. अतिवृष्टीच्या काळात राबवलेल्या मेंटर-मेंटी योजनेप्रमाणे आताही पुढाकार घ्यावा. सक्षम महाविद्यालयांनी जास्त दुष्काळ असलेल्या भागातील महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांना मदतीचा हात द्यावा. उच्च शिक्षण क्षेत्राने याकडे औपचारिकता म्हणून न पाहता एक कुटुंब म्हणून या परिस्थितीचा सामना करावा.



विद्यापीठ स्तरावर टास्क फोर्स करावे


या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी उच्च शिक्षण संचालनालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करावा तसेच प्रत्येक विद्यापीठात टास्क फोर्स स्थापन करून महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांसाठी मदत कार्य सुरू करावे.  यासाठी विद्यापीठे आणि महाविद्यालयांकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा दर १५ दिवसांनी आढावा घ्यावा असेही मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.