Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

‘गोकुळ’ निवडणुकीत गडहिंग्लजमध्ये मंत्री मुश्रीफांचे शक्तीप्रदर्शन; ३३० ठरावधारक सोबत असल्याचा दावा

गडहिंग्लज तालुक्यातील महायुतीचे सर्व ठरावधारक एकवटले


नेत्यांच्या उपस्थितीत मतदानासाठी एकजुटीचा एल्गार




गडहिंग्लज (प्रतिनिधी): कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’च्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडहिंग्लज तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकीच्या निमित्ताने गडहिंग्लज तालुक्यातील महायुतीचे सर्व ठरावधारक राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व एकजूट दाखवत आणि मोठ्या शक्तीप्रदर्शनाने मतदान केंद्रावर दाखल झाले. "गडहिंग्लज तालुक्यातील ३३० ठरावधारक आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत," असा ठाम विश्वास यावेळी नामदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. ‘गोकुळ’च्या या रणधुमाळीत गडहिंग्लज तालुका नेहमीच निर्णायक ठरला आहे. 



याप्रसंगी चंदगडच्या ज्येष्ठ नेत्या नंदाताई बाभुळकर, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी (केडीसीसी) बँकेचे संचालक संतोष पाटील, कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष व नगरसेवक आदिल फरास, माजी जिल्हा परिषद सदस्य संग्रामसिंह कुपेकर, गोड साखर कारखान्याचे चेअरमन प्रकाशभाई पताडे, गडहिंग्लज नगरपालिकेचे प्रभारी नगराध्यक्ष महेश सलवादे, माजी नगराध्यक्षा सौ. स्वाती कोरी, गोड साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रकाश चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य हेमंत कोलेकर यांच्यासह तालुक्यातील इतर अनेक दिग्गज मान्यवर व ठरावधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



मतदान केंद्राबाहेर कार्यकर्त्यांचा उत्साह आणि नेत्यांच्या उपस्थितीमुळे परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. महायुतीच्या या अभूतपूर्व एकजुटीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.