प्रथम महात्मा गांधीजींच्या पुतळ्यास अभिवादन त्यानंतर केले मतदान
वैयक्तिक मूल्यांशी प्रामाणिक राहून बजावले कर्तव्य; सहकार वर्तुळातून कौतुक
गडहिंग्लज ( प्रतिनिधी): गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरु आहे. या मतदान प्रक्रियेत प्रत्येक मतदाराने आपापल्या परीने लोकशाहीचा हक्क बजावून सहकार चळवळीला मजबूत करण्याचे काम करत आहेत. याच मतदान प्रक्रियेदरम्यान तेरणी (ता. गडहिंग्लज) येथील सुपुत्र आणि सहकारप्रेमी अरुण देसाई यांनी आपल्या वैयक्तिक तत्त्वांना स्मरून आणि सामाजिक बांधिलकी जपत स्वखर्चाने व स्वतःच्या वाहनाने गडहिंग्लज येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.
गांधीजींच्या विचारांना अभिवादन करून मतदानाचा प्रारंभ
गडहिंग्लज येथे पोहोचल्यानंतर अरुण देसाई यांनी सर्वप्रथम प्रांत कार्यालय आवारात असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नम्र अभिवादन केले. स्वावलंबन आणि लोकशाही मूल्यांवर श्रद्धा ठेवून त्यांनी आपल्या मतदानाची सुरुवात केली. त्यांच्या या राष्ट्रप्रेमी आणि संयमी आचरणामुळे परिसरातील उपस्थितांचे लक्ष वेधले गेले.
तत्त्वांची जपणूक आणि वैयक्तिक निर्णय
प्रत्येक मतदाराची सहकारातील निष्ठा अनन्यसाधारण असते. अरुण देसाई यांनी आपल्या वैयक्तिक जीवनमूल्यांना प्राधान्य देत या प्रवासासाठी कोणताही प्रवासभत्ता किंवा सुविधा न घेता पूर्णपणे स्वतःच्या खर्चाने गडहिंग्लज येथील मतदान केंद्रावर जाण्याचा निर्णय घेतला. सहकार क्षेत्रातील आपल्या प्रवासाची ही एक वैयक्तिक निष्ठा मानून त्यांनी ही जबाबदारी पार पाडली.
सहकार वर्तुळातून कौतुकाचा वर्षाव
गोकुळ दूध संघाच्या मतदानात सहभागी झालेल्या सर्वच ठरावधारकांनी अत्यंत उत्साहात आणि सहकार भावनेने आपल्या मतदानाचा हक्क पार पाडत आहेत. त्यातच अरुण देसाई यांनी आपल्या स्वावलंबी आणि साध्या राहणीमानाच्या तत्त्वातून दाखवलेली ही वैयक्तिक निष्ठा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या या तत्त्वनिष्ठ आणि सकारात्मक भूमिकेबद्दल तेरणी गावासह गडहिंग्लज तालुक्यातील सहकार वर्तुळातून त्यांचे कौतुक होत आहे.

