Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

वन विभागाने विद्यार्थ्यांमध्ये जागवली पर्यावरणप्रेमाची ज्योत!

 तेरणी मराठी विद्यामंदिर शाळेत ‘वन्यजीव सप्ताह’ उत्साहात




गडहिंग्लज (प्रतिनिधी): निसर्गाचा समतोल राखण्यासाठी जंगले आणि त्यातील वन्यजीवांचे संरक्षण करणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. जंगले सुरक्षित राहिली तरच मानवजातीचे अस्तित्व टिकून राहील, असे प्रतिपादन गडहिंग्लजचे वन परिमंडळ अधिकारी सागर पोवार यांनी केले. मराठी विद्यामंदिर तेरणी येथे कोल्हापूर वनविभागाच्या वतीने आयोजित 'वन्यजीव सप्ताह' मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.


कार्यक्रमात श्री. पोवार यांनी विद्यार्थ्यांना वन व वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धन का व कसे करावे, याविषयी सविस्तर व मार्गदर्शनपर माहिती दिली. या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी वनविभागावर आधारित सामान्यज्ञान (जीके) स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.



या कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य स्वप्नील इंगवले, माजी सरपंच रमेश पुजेरी, माजी सरपंच करवीर उथळे, तंटामुक्त समिती अध्यक्ष राजू इंगवले, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सौ. गीता गोरे, सदस्य संतोष व्हनोळी, सदस्य सौ. सारिका हजेरी यांची प्रमुख उपस्थिती होती.



तसेच वनविभागाच्या वतीने वनरक्षक प्रकाश शिंदे, वनरक्षक दयानंद शिंदे, वनरक्षक रुद्रगोंडा पाटील, वनसेवक मारुती पाटील आणि किशोर नाईक उपस्थित होते. याशिवाय शाळेचे शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. काल्लोळे यांनी केले. उपस्थितांचे आभार सखरू भोसले यांनी मानले.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.