Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'गोकुळ'वर सतेज पाटलांचा 'गुलाल'! महायुतीचा धुव्वा; शौमिका महाडिक अवघ्या ७ मतांनी पराभूत

'गोकुळ'वर शाहू समविचारी आघाडीचे वर्चस्व




कोल्हापूर (प्रतिनिधी): राजकीयदृष्ट्या अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) पंचवार्षिक निवडणुकीत सत्तांतराचा मोठा भूकंप झाला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील 'राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने' जोरदार मुसंडी मारत गोकुळची सत्ता आपल्या हाती घेतली आहे. या निवडणुकीत महायुतीला एकापाठोपाठ एक मोठे धक्के बसले असून अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.


७ मते......आणि फेरमतमोजणीची मागणी


या निवडणुकीतील सर्वात रंजक आणि चुरशीची लढत महिला गटात पाहायला मिळाली. महायुतीच्या 'छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी'च्या उमेदवार शौमिका महाडिक यांचा अवघ्या ७ मतांनी पराभव झाला. पराभवाचा हा फरक अत्यंत सूक्ष्म असल्याने शौमिका महाडिक यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे फेरमतमोजणी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे अधिकृत अंतिम घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


महाडिक, मुश्रीफ यांना धक्का


वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुत्र नविद मुश्रीफ यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर आता भाजप नेत्या शौमिका महाडिक यांचाही पराभव झाल्याने कोल्हापूरच्या सहकार व राजकीय पटलावर प्रदीर्घ काळ दबदबा असणाऱ्या महाडिक कुटुंबासह महायुतीला मोठा राजकीय फटका बसला आहे. महायुतीने सर्व मंत्र्यांची ताकद आणि यंत्रणा पणाला लावूनही मतदारांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कौल दिला.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.