Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

BREAKING NEWS: महायुतीला धक्का, समविचारी आघाडीची बाजी; फेरमोजणीचे अर्ज नामंजूर !



कोल्हापूर : जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू असलेल्या बहुचर्चित 'गोकुळ' दूध संघाच्या निवडणुकीचा अंतिम निकाल अखेर जाहीर झाला असून राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या अत्यंत चुरशीच्या आणि अटीतटीच्या लढतीत 'समविचारी आघाडी'ने १३ जागांवर दणदणीत विजय मिळवत गोकुळवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे तर दुसऱ्या बाजूला 'महायुती'ला १२ जागांवर समाधान मानावे लागले आहे.


फेरमोजणीचे अर्ज फेटाळले; युवराज पाटील, विश्वास पाटलांना धक्का


निकालानंतर वातावरणातील उत्कंठा शिगेला पोहोचली असतानाच, सर्वसाधारण गटातील प्रमुख उमेदवार युवराज पाटील आणि विश्वास पाटील यांनी निकालावर आक्षेप घेत 'फेरमोजणी'साठी अर्ज सादर केले होते. मात्र, निवडणूक प्रशासनाने हे दोन्ही अर्ज नामंजूर केले आहेत.


अंतिम आघाडी चित्र:


समविचारी आघाडी: १३ जागा (सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा)


महायुती: १२ जागा



गोकुळ अधिकृत विजयी उमेदवार 


सतेज पाटील गट 

समविचारी आघाडी 


१)अभिजित तायशेटे, 

२ )शशिकांत पाटील चुयेकर, 

३ )बाबासाहेब देवकर, 

४)राहुल देसाई, 

५)विद्याधर गुरबे, 

६)किसन चौगले, 

७ )विश्वजित जाधव आणि

८ ) बाबासाहेब चौगले 

ओबीसी गटातून 

९)शशिकांत खोत, 


महिला राखीव गटातून

१०) अंजना रेडेकर 

११) भाग्यश्री डोंगळे,


 भटक्या-विमुक्त गटातून 

१२ )बयाजी शेळके, 


 अनुसूचित जाती गटातून 

१३)माजी आमदार राजू आवळे 



महायुती


१ )चेतन नरके, 

२ )अजित नरके,

३ ) राजेश पाटील, 

४ )वीरेंद्र मंडलिक,

५ ) रणजितसिंह के. पाटील, 

६ )रणजितसिंह दिलीप पाटील,

७ )अजित पाटील-परितेकर,

८ )  युवराज पाटील, 

९ )मदन देसाई, 

१० )अंबरीश घाटगे, 

११ )अमरसिंह पाटील 

१२ ) करणसिंह गायकवाड


या धक्कादायक निकालामुळे कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रात आणि राजकीय पटलावर मोठे भूकंप झाले असून विजयोत्सवाला उधाण आले आहे!

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.