Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जरळीत वाचन प्रेरणा दिन आणि हात धुवा दिन साजरा

ज्ञानदा मोफत वाचनालय, जरळी हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम 


जरळी : निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा ग्रंथभेट देऊन गौरव करण्यात आला. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष ग्रंथमित्र दत्ता देशपांडे, मुख्याध्यापक शिंदे, रावसाहेब मुरगी, टी.एम.दुंडगे, विठ्ठल चौगुले. 


गडहिंग्लज (प्रतिनिधी): जरळी (ता. गडहिंग्लज) येथील ज्ञानदा मोफत वाचनालय आणि जरळी हायस्कूल जरळी यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन आणि हात धुवा दिन असा संयुक्त कार्यक्रम घेण्यात आला.


मुख्याध्यापक आर. के. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास कवी रावसाहेब  मुरगी आणि वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष ग्रंथमित्र दत्ता देशपांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.



मुख्याध्यापक आर. के. शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी वाचनालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे गौतमी  दुंडगे, रिया होडगे, दुर्गा बागडी, प्रणव  तोळे, ईश्वरी खामकर यांचा उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला. निबंध स्पर्धेत ४० विद्यार्थ्यांनी भाग घेतला.यावेळी टी. एम.  दुंडगे, रावसाहेब मुरगी, दत्ता देशपांडे यांची भाषणे झाली. यावेळी विठ्ठल चौगुले, महादेव धनगर, नंदकुमार लोंढे, ग्रंथपाल शिवाजी मांगले, सहाय्यक ग्रंथपाल अक्षता होडगे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते  श्रद्धा लब्बी यांनी सूत्रसंचालन केले. तर सविता धनगर यांनी आभार मानले.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.