गडहिंग्लज (प्रतिनिधी): भडगाव येथे कै बापुसो आप्पासो कितुरकर सार्वजनिक मोफत वाचनालयात आज भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान शास्त्रज्ञ डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त "वाचन प्रेरणा दिन" साजरा करण्यात आला.
प्रतिमेचे पूजन सामाजिक कार्यकर्ता वसंत नाईक यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी भडगाव पोस्ट मास्तर बाळासाहेब केसरकर, ग्रंथपाल महादेव भकरी, विशाल चव्हाण यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

