Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजला भाजप मंडळातर्फे महात्मा गांधी यांना अभिवादन

जयंती निमित्त प्रांत कार्यालयासमोरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण




गडहिंग्लज (प्रतिनिधी): राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी, गडहिंग्लज मंडळातर्फे प्रांत कार्यालयासमोरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. भाजपा गडहिंग्लज मांडलाचे उपाध्यक्ष श्री. कुमार पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.


यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासही पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.


महात्मा गांधी यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात दिलेल्या योगदानाचे यावेळी स्मरण करण्यात आले. सत्य, अहिंसा आणि स्वातंत्र्याच्या मूल्यांसाठी त्यांनी केलेला संघर्ष देशासाठी सदैव प्रेरणादायी राहील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


यावेळी भाजपा गडहिंग्लज तालुका अध्यक्ष प्रितम कापसे, मंडल सरचिटणीस सचिन घुगरे, अमित देशपांडे, उपाध्यक्ष सुदर्शन चव्हाण, शहर अध्यक्ष संदीप कुरळे, माधव उर्फ बाळ पोटे - पाटील युवा मोर्चाचे भीमराव कोमारे, ऋषभ कासार यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.