Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाकडून पीक परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी

नाणेगाव, किणगाववाडी, जामखेड परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधून जाणून घेतली वस्तुस्थिती

    



जालना :  जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आंतरमंत्रालयीन पथकाने जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील नाणेगाव तसेच अंबड तालुक्यातील किणगाववाडी आणि जामखेड परिसरातील शेतपिकांची प्रत्यक्ष पाहणी करून पीक परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. पावसाअभावी पिकांच्या वाढीवर झालेला परिणाम, पाण्याची उपलब्धता, संभाव्य पीक नुकसान आणि शेतकऱ्यांसमोरील अडचणी यांची प्रत्यक्ष शेतावर जाऊन माहिती घेत पथकाने दुष्काळी परिस्थितीची वस्तुस्थिती जाणून घेतली.



कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे संयुक्त सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मुक्तानंद अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील या केंद्रीय पथकात महालनोबिस राष्ट्रीय पीक पूर्वानुमान केंद्राचे उपसंचालक सुनील कुमार दुबे, नीती आयोगाचे सल्लागार डॉ. जसपाल सिंग आणि पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाच्या पशुधन अधिकारी डॉ. साक्षी भदौरिया यांचा समावेश होता.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.