Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

ब्रेकिंग न्यूज : महायुतीचे १४ तर समविचारी आघाडीचे ६ उमेदवार आघाडीवर; माजी अध्यक्ष अरुण डोंगळे पिछाडीवर!



कोल्हापूर: गोकुळ दूध संघ निवडणुकीच्या मतमोजणीत तिसऱ्या फेरीनंतर अत्यंत नाट्यमय घडामोडी समोर आल्या आहेत. महायुतीचे तब्बल १४ उमेदवार आघाडीवर असले तरी गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे मोठ्या मतांनी पिछाडीवर आहेत.


तिसऱ्या फेरीअखेर महायुतीचे दिग्गज नेते तथा माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्यासह अशोक चराटी, प्रताप पाटील कावणेकर, एस. आर. पाटील, अमर पाटील आणि कर्णसिंह गायकवाड हे उमेदवार पिछाडीवर आहेत.

 

दुसरीकडे समविचारी आघाडीने जोरदार कमबॅक केले असून, त्यांच्या सर्वसाधारण गटातील शशिकांत पाटील-चुयेकर, विद्याधर गुरबे, बाबासाहेब चौगले, किसन चौगले, राहुल देसाई आणि अभिजीत तायशेटे हे सर्व ६ उमेदवार आघाडीवर आहेत.

सध्या मतमोजणीची रंगत वाढली असून, पुढील फेऱ्यांमध्ये काय निकाल लागणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.