गडहिंग्लज (संपत सावंत) : आजच्या स्पर्धेच्या आणि धावपळीच्या युगात माणुसकी, सत्य, अहिंसा, आणि सामाजिक बांधिलकीची मुल्ये जपण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या विचारांचे आचरण करणे ही काळाची गरज आहे. त्यांचे विचार केवळ स्मरणात न ठेवता ते आपल्या जीवनात तंतोतंत आत्मसात केल्यास संवेदनशील, सुसंस्कृत समाजाची निर्मिती होऊ शकते असे प्रतिपादन विद्या प्रसारक मंडळ, गडहिंग्लज संचलित जागृती हायस्कूल व आर. के. ज्युनि. कॉलेज गडहिंग्लज येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त केले.
स्वागत उपमुख्याध्यापक अनिल मसाळे यांनी केले. राधानगरी तालुका क्रीडाअधिकारी सुधाकर जमादार व राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक राजाराम खांडे यांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
पुढे बोलताना मकानदार म्हणाले, गांधीजींनी सत्याग्रह स्वावलंबन, सहकार आणि सर्वसमावेशकतेचा विचार समाजाला योग्य दिशा देणारा असून त्यांचे विचार आत्मसात करून ते आपल्या आचरणातून प्रत्यक्षात आणणे काळाची गरज असल्याचे सांगितले. लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्याचा उल्लेख करताना त्यांनी 'जय जवान, जय किसान' या घोषणेची आठवण करून दिली. त्यांनी देशातील जवान व शेतकरी यांचे महत्त्व अधोरेखित केले. महात्मा गांधीजी व शास्त्री यांचे विचार आत्मसात करून ते आपल्या आचरणातून प्रत्यक्षात आणणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असे सांगितले.
यावेळी मुख्याध्यापक उमेश सावंत, प्रा. विद्या पन्हाळे,प्रा. स्वाती क्षीरसागर, महंतेश दड्डी प्रा. गुरुलिंग खंदारे, प्रा. पी.बी. रक्ताडे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका, प्राध्यापक, प्राध्यापिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल कांबळे यांनी तर आभार इराप्पा मरडी यांनी मानले.


