Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक पतसंस्थेतर्फे गडहिंग्लजमध्ये शिक्षकांना दिवाळी भेट



गडहिंग्लज (प्रतिनिधी):  दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आणि सभासद शिक्षकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या (कोजीमाशी) गडहिंग्लज शाखेच्या वतीने येथील साधना हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट वस्तूंचे उत्साहात वितरण करण्यात आले. पतसंस्थेचे नेते दादा लाड  यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमामुळे शिक्षक वर्गात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साधना हायस्कूलचे प्राचार्य अरविंद बारदेस्कर हे होते.


या विशेष दिवाळी भेट वितरण कार्यक्रमात सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना १० लिटर स्टार सूर्यफूल तेल आणि मोठा आकर्षक प्लास्टिक टब या उपयुक्त भेटवस्तू सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आल्या.


यावेळी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष तथा शाखा अध्यक्ष सचिन शिंदे, संजय देसाई, रफिक पटेल, सतीश कांबळे, माध्यमिक पतसंस्थेचे अध्यक्ष विनायक नाईक, संचालक अनिल पाटील, संचालक रमेश चौगुले आणि गणपतराव सूर्यवंशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यांच्या हस्ते सभासदांना भेटींचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास गडहिंग्लज परिसरातील बहुसंख्येने शिक्षक व सेवक वर्ग उपस्थित होता.




हा दीपोत्सव कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी गडहिंग्लज शाखेचे संदीप शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत नियोजनबद्ध परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व सभासदांनी आपल्याला मिळालेल्या या दर्जेदार दिवाळी भेटीबद्दल पतसंस्थेचे अध्यक्ष, सर्व संचालक मंडळ तसेच 'कोजीमाशी'चे खंदे नेते दादा लाड यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांचे विशेष आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.