Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गिजवणे येथील चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

श्री हनुमान कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजन 




गडहिंग्लज (प्रतिनिधी): गिजवणे येथील श्री हनुमान कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ  यांच्यामार्फत  शालेय विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत परिसरातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कलेची अप्रतिम चुणूक दाखवली.




विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार या स्पर्धेचे एकूण तीन गटांत वर्गीकरण करण्यात आले होते. यामध्ये इयत्ता पहिली ते चौथी (लहान गट) आणि इयत्ता पाचवी ते सातवी (मध्यम गट) तसेच इयत्ता आठवी ते दहावी (मोठा गट)अशा गटांमधून विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात आपल्या कुंचल्याच्या साहाय्याने कागदावर सुंदर कलाकृती साकारल्या.




स्पर्धेचे परीक्षण कलाक्षेत्रातील जाणकार  डी. एल. लोहार आणि सौ. आरती पाटील यांनी अत्यंत  पारदर्शक पद्धतीने केले. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कलाकृतींमधून विजेत्यांची निवड करणे परीक्षकांसाठीही नक्कीच आव्हानात्मक ठरले.




स्पर्धेतील विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे 


 लहान गट (इयत्ता १ ली ते ४ थी): प्रथम क्रमांक अक्षरा आनंद पाटील, द्वितीय क्रमांक: स्वरा अमित कोकितकर,तृतीय क्रमांक: श्रीजा श्रीकांत पाटील, चतुर्थ क्रमांक:श्रुती भानुदास कुलकर्णी, पाचवा क्रमांक: साक्षी मनीष मिसाळ.



मोठा गट (इयत्ता ८ वी ते १० वी): प्रथम क्रमांक: आर्या सुभाष पाटील, द्वितीय क्रमांक:अन्वी आप्पासाहेब मगदूम, तृतीय क्रमांक (संयुक्त): आराध्या जयवंत शिंदे आणि स्नेहल सचिन गोते, चतुर्थ क्रमांक: संस्कार संतोष नरवाडे, पाचवा क्रमांक: वेदांत बंदी.





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.