Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिक्षक हाच समाज परिवर्तनाचा खरा शिल्पकार - प.पू. भगवानगिरी महाराज

गडहिंग्लजमध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघातर्फे सत्कार सोहळा संपन्न;  विविध पुरस्कारांनी गुणवत्तेचा गौरव




गडहिंग्लज (प्रतिनिधी): शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तन घडवून आणणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे शिक्षक आहे," असा मूलमंत्र नूल मठाचे मठाधिपती धर्माचार्य प.पू. भगवानगिरी महाराज यांनी दिला. निमित्त होते, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ गडहिंग्लज तालुक्याच्या वतीने आयोजित भव्य सत्कार सोहळ्याचे.


स्थानिक पातळीवर शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा हा सन्मान सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक शिक्षक बँक कोल्हापूरचे संचालक नंदकुमार तुकाराम वाईंगडे हे होते.




कार्यक्रमात मार्गदर्शन करताना  नंदकुमार वाईंगडे म्हणाले, सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या मराठी शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण दिले जात आहे. आजच्या AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) च्या युगात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शिक्षकांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून काळानुसार स्वतःला अपडेट करणे गरजेचे आहे.


विविध पुरस्कारांनी शिक्षकांचा गौरव


या विशेष सोहळ्यात शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी गडहिंग्लज तालुक्यातील खालील शिक्षकांना गौरविण्यात आले. साने गुरुजी सेवा गौरव पुरस्कार: अनिल हळींगळे (विद्यामंदिर अरळगुंडी), सौ. जयश्री जांभळे (पी.एम.श्री.विद्यामंदिर जरळी), डॉ. जयंत नारळीकर शिष्यवृत्ती मार्गदर्शक पुरस्कार: सौ. मीनाक्षी शिंगटे (पी.एम.श्री. बॅ. नाथ पै विद्यालय), निलेश पोवार (विद्यामंदिर सावतवाडी तर्फ नेसरी). महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार: भरत शेळके (विद्यामंदिर, ऐनापूर). शिक्षक संघरत्न पुरस्कार: महेश कुंभार (विद्यामंदिर, नौकुड), संदीप बाबर (विद्यामंदिर, हरळी खुर्द), सौ. सपना पाथरवट (विद्यामंदिर, बसर्गे रस्ता खंदळ). पी.सी. पाटील गुरुजी शिक्षणमंच कार्यकर्ता पुरस्कार: सौ. वैशाली गोष्टी (विद्यामंदिर, वडरगे). शांतिनिकेतन ज्ञानमंदिर आदर्श शाळा पुरस्कार: विद्यामंदिर (हिरलगे) व विद्यामंदिर गांधीनगर (हलकर्णी).



तसेच, जिल्हा परिषद कोल्हापूरचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले सुनील सुरंगे व नंदकुमार देसाई आणि गडहिंग्लज नगर परिषदेतर्फे साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेल्या सौ. मनीषा वालीकर यांचाही शिक्षक संघ व म.पी.सी. पाटील गुरुजी पतसंस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. याशिवाय, पवित्र पोर्टल अंतर्गत नवनियुक्त शिक्षण सेवक आणि इयत्ता चौथी व सातवीचे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक यांचाही गौरव करण्यात आला.



यावेळी पतसंस्थेचे सभापती विनायक पोवार, नवनियुक्त शिक्षक  करीम जमादार आणि सौ. मनीषा वालीकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास शिक्षक संघटनेचे मार्गदर्शक शंकर साळुंखे, संभाजी जाधव, माजी सभापती बाळासाहेब वालीकर, संजीव गोणी, सूर्यकांत चौगुले, काशिनाथ साखरे, बाळासाहेब चौगुले, भीमराव तराळ, आनंद पाटील, युवराज भोसले, विष्णू कुराडे, अर्चना निळकंठ, शरद देसाई, विजय शिंदे यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अध्यक्ष अनिल बागडी यांनी केले, सूत्रसंचालन सचिन गवळी यांनी तर आभार सरचिटणीस आयाज बागवान यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपसभापती उज्वल कुंभार, कोषाध्यक्ष अनिल गोणी, प्रसिद्धी प्रमुख सुनील कांबळे, विक्रम गडकर, प्रतीक येसादे, राहुलकुमार बागडी व सर्व संचालक मंडळाने विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.