Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

ब्रेकिंग न्यूज : 'गोकुळ' मतमोजणीत चुरस वाढली! दुसऱ्या फेरीतही मोठ्या प्रमाणावर 'क्रॉस व्होटिंग'; महायुतीचे १७ तर सतेज पाटलांचे ४ उमेदवार आघाडीवर



सकाळी ११:३० वाजेपर्यंतची अपडेट: 

सर्वसाधारण गटातील १६५० मते मोजणी पूर्ण. सर्व तालुक्यांमध्ये सरासरी ५० ते ५५ टक्के क्रॉस व्होटिंगचा अंदाज वर्तवला जात आहे. आमदार विनय कोरेंच्या बालेकिल्ल्यात सतेज पाटील यांच्या आघाडीच्या उमेदवारांनी जोरदार मुसंडी मारली आहे.


पहिला कल


महायुतीचे सर्वसाधारण गटातील २० पैकी १७ उमेदवार किरकोळ मतांनी आघाडीवर असून, सतेज पाटील यांचे ४ उमेदवार आघाडीवर आहेत.


बाद मतांचा आकडा वाढणार


आतापर्यंत तब्बल २०० मतपत्रिका बाद ठरल्या असून, हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. निकालाच्या सुरुवातीच्या फेऱ्यांपासूनच अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळत असल्याने, शेवटपर्यंत टायट मुकाबला राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.